पुण्याच्या हिंजवडी परिसरात स्थानिक रहिवाशांना आजही पाण्याची समस्या भेडसावत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहिती ग्रामपंचायत सदस्य सागर साखरे यांनी दिली. यापुढील काळात केंद्र शासन आणि राज्य शासनाचा दुवा बनून या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज दिली.

सुनेत्रा पवार यांनी आज हिंजवडी परिसरातल्या एस्पेरिया, ग्रीष्मा, वसंतोत्सव, शरद, बागेश्री अशा विविध सोसायटीतल्या लोकांशी संवाद साधला. यावेळी जितेंद्र निखारे, अश्विन कोळी, पंकज जाधव, मोहन घाडगे यांच्यासह विविध सोसायटींचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते. या सर्वांनी बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही दिली. यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारीही उपस्थित होते.
