Homeचिट चॅट'सूफी तरंग'ला मराठा...

‘सूफी तरंग’ला मराठा मंदिरचा संशोधनात्मक साहित्य पुरस्कार!

मराठा मंदिर संस्थेचा यंदाचा प्रतिष्ठेचा संशोधनात्मक साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांच्या ‘सूफी तरंग’ या पुस्तकाला प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव आणि भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिरच्या वास्तूत झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

हजरत अल्हाज ख्वाजा मजिदूल हसन शहा हसनी यांच्या मानवतावादी मजिदिया पंथाच्या प्रेरणेतून साकारलेल्या या पुस्तकासाठी सूफी फैजुल हसन शहा मजिदी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. सूफी पंथाचा उदय, गुरुभक्तीचे मार्ग, सूफी विचारधारा, विविध सूफी संप्रदाय, जगभरातील आणि भारतातील सूफी संत, खानकाह (मठ, आश्रम), सूफी संगीत, हिंदू आणि सर्वधर्मीयांशी असलेले आपुलकीचे नाते, श्रद्धांस्थाने, याकूब बाबांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली श्रद्धा आदी विविद मुद्यांचा परामर्श यात घेण्यात आला आहे. त्यासाठी जगभरातील अनेक संदर्भ ग्रंथांचा तसेच प्रत्यक्षात चर्चेतून अनेक मुद्यांना यातून अशोक शिंदे यांनी लिहिले आहे. 

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content