Saturday, July 6, 2024
Homeहेल्थ इज वेल्थस्त्री भ्रूणहत्त्या रोखण्यासाठी...

स्त्री भ्रूणहत्त्या रोखण्यासाठी राज्यशासनाची ‘आमची मुलगी’!

राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता व स्त्री भ्रूणहत्त्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ (पीसीपीएनडीटी आणि एम.टी.पी)ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे.

पीसीपीएनडीटी आणि एमटीपी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विविध योजनांची कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्री भ्रूणहत्त्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी तसेच याविषयी कुठल्याही शंकेचे निरसन करण्यासाठी http://amchimulgimaha.in/ हे नवीन संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.

या संकेतस्थळावर कोणीही तक्रार नोंदविल्यास ती तक्रार गोपनीय राहील व तक्रार देणाऱ्यास त्याची इच्छा असल्यास ते नावदेखील नोंदवू शकतील. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत तक्रार निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तक्रारीची अंमलबजावणी होऊन जर स्त्री भ्रूणहत्त्या रोखण्यास यश आले, तर तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम रुपये १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या संकेतस्थळाचा लाभ घेऊन समाजातील जन्म लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यास सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

Continue reading

‘डायल 108’ने 10 वर्षांत केली 1 कोटी रूग्णांची ने-आण

आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल 108’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत उपयोगी ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्यसेवा करीत तब्बल 10 वर्ष पूर्ण केली आहेत. या 10 वर्षांच्या कालावधीत या रूग्णवाहिका सेवेने राज्यात 1 कोटी 3 हजार 446 रूग्णांची विनामूल्य...

आता भटक्या-विमुक्तांना स्वयंघोषणापत्रावर मिळणार शिधापत्रिका

भटके आणि विमुक्तांना ओळखपत्र वा वास्तव्याचा पुरावा नसला तरी त्यांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासननिर्णयदेखील निर्गमित करण्यात आला आहे. कोणतेही कागदपत्र व आधारकार्ड उपलब्ध नसल्यास अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्र भरुन घेण्यात येणार असून त्याआधारे त्यांना शिधापत्रिका देण्यात...

क्रिकेटरसिक गेल्यानंतर मरीन ड्राइव्हवर सापडले ५ जीपभर जोडे

टी-२० क्रिकेट विश्वचषकविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्हवर उसळलेल्या जनसागरानंतर गुरूवारी रात्रभर मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत तब्बल पाच जीप भरून चप्पल-बूट तसेच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्यात आल्याचे वृत्त आहे. पालिकेच्या ए विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सुमारे...
error: Content is protected !!