Friday, November 22, 2024
Homeपब्लिक फिगरमराठा आरक्षण संपवण्याचा...

मराठा आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव – प्रविण दरेकर

अनैसर्गिकरीत्या आलेल्या राज्य सरकारचा मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय नाही. मराठा आरक्षणाबाबतीत भारतीय जनता पक्षाने जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका आज सरकार मराठा आरक्षणासंदर्भात घेत नाही. तसेच भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देताना भाजपने सामाजिक संतुलन राखले होते. पण ते या सरकारकडून राखल्याचे दिसत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली. 

भाईदंर येथे भाजप वैद्यकीय आघाडी (प्रकोष्ठ) पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात ‘महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण’ या विषयावर दरेकरांनी उपस्थितांना संबोधित केले. तेव्हा ते बोलत होते. राज्यातील विकासाचा बोजवारा उडाला असून सामाजिक संतुलन बिघडले आहे. अनैसर्गिकरित्या आलेल्या सरकारमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजून तसाच रेंगाळलेला आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले तर सुप्रीम कोर्टात टिकवण्याची जबाबदारी कोणाची होती? सरकारची होती ना.. या आरक्षणासाठी सरकारने कोणते प्रकारचे नियोजन केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात सुप्रीम कोर्टात तारीख आली. पण तेथे सरकारचे प्रतिनिधीत्व करणारे वकील उपस्थित नव्हते. दस्तावेज न्यायालयात सादर करावे लागतात. पण त्यावेळी सरकारकडून योग्य दस्तावेज उपलब्ध झाले नाहीत. त्याचवेळी राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातील निष्काळजीपणाची भूमिका स्पष्ट झाली असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण देत असताना भाजपने सामाजिक संतुलन राखले होते. ओबीसींचे आरक्षण राखून आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. धनगर समाजाला एक हजार कोटी देण्याची भूमिका भाजपने घेतली होती. मराठा आरक्षण देताना आमच्या सरकारने ओबीसी समाज, धनगर समाजाची काळजी घेतली होती, सामाजिक संतुलन राखले होते. हीच भूमिका सरकार का घेत का नाही असा सवालही त्यांनी केला.

भाजप आतापर्यंत जनतेसाठी काम करत आले आहे. भाजपला काही मिळते यापेक्षा मला समाजाला काय द्यायचे या भावनेतून आपण सगळे पक्षासाठी काम करतो. केवळ समाजातून नाही तर महाराष्ट्रातून, देशातून चांगला संदेश जात दिला जात आहे अशी भावना त्यावेळी व्यक्त केली असे दरेकर यांनी त्यावेळी सागितले.

कोरोनासारख्या संकटाच्या काळात भाजपाच्या वैदयकीय आघाडीने युद्धपातळीवर काम केले. भाजपच्या माध्यमातून या आघाडीमधील सहभागी डॉक्टर व अन्य पदाधिकाऱ्यांनी कोरोनोच्या काळात केलेल्या कामामुळे हजारोंना जीवदान मिळाले या शब्दात दरेकर यांनी आघाडीच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी डॉ. अजित गोपछेडे, डॉ. बाळासाहेब हरपडे, डॉ. स्वप्नील मंत्री, डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. मेघना चौघुले, डॉ. अनुप मगर, डॉ. विकी, डॉ. गोविंद भताने आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content