Homeडेली पल्सराज्य सरकारी अधिकाऱ्यांचे...

राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांचे निधन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. मात्र, राज्य सरकारी कर्माचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या हयातीत फलद्रूप होऊ शकले नाहीत.

गेल्या ५० वर्षाँच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे  नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल ७२ खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार म्हणून ते तहहयात कार्यरत होते. १९७० च्या दशकात त्यांनी विक्रीकर कर्मचारी संघटनेतून सुरू केलेली प्रवासगाथा पुढे विविध मध्यवर्ती कर्मचारी संघटनांमध्ये नेतृत्त्व करत अखेर “महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ” या शिखर संघटनेच्या स्थापनेपर्यंत पोहोचली. कोणत्याही प्रश्नात दोन्ही बाजू समजून घेऊन तोडगा काढणे, हे त्यांचे वैशिष्ट्यं होते. त्यांनी २०पेक्षा अधिक कर्मचारी संघटनांना एकत्र आणले. राज्यस्तरीय चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून अनेक नेतृत्त्वांना संधी दिली. प्रशासन आणि कर्मचाऱ्यांतला संवाद सतत चालू राहवा यासाठी सांघिक बैठका व तंत्रशुद्ध सादरीकरणाचा आग्रह त्यांनी धरला.

कुलथे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुनियाद को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, दुसरा मजला, सेक्टर १५ , नेरूळ (पूर्व), नवी मुंबई येथे सकाळी ९ ते १२.३० दरम्यान ठेवण्यात येणार आहे. पार्थिवावर दुपारी १.०० वाजता नेरूळ स्मशानभूमी, सेक्टर-४, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई येथे अंत्यसंस्कार होतील. ग. दि. कुलथे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content