Homeब्लॅक अँड व्हाईटखेळाडू युवतींच्या प्रोत्साहनासाठी...

खेळाडू युवतींच्या प्रोत्साहनासाठी भारतीय लष्कराची क्रीडा कंपनी

ॲथलेटिक्स, तिरंदाजी, मुष्टियुद्ध आणि भारोत्तोलन या चार क्रीडा प्रकारांमध्ये, युवा महिला खेळाडूंना (युवती) अधिकाधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन उपलब्ध करण्याकरीता भारतीय लष्कराने आर्मी स्पोर्ट्स गर्ल्स कंपनी म्हणजे लष्करी युवती क्रीडा कंपनी स्थापन केली आहे.

या कंपन्यांच्या कार्यान्वयासाठी, दोन उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या जागा म्हणजे, मऊ इथले आर्मी मार्क्समॅनशिप युनिट आणि पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स

इंस्टिट्यूट. पुणे इथल्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट इथे, पहिल्या प्रवेश रॅलीच्या उद्घाटनाच्या दिवशी, देशभरातील तब्बल 980 मुलींनी निवड चाचण्यांमध्ये भाग घेतला. 12 ते 16 वयोगटातील मुलींच्या क्रीडाविषयक प्रशिक्षणाच्या गरजा पूर्ण करणारा हा उपक्रम, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी एक व्यासपीठ ठरणार आहे.

या चार खेळांसाठी निवड झालेले खेळाडू कठोर प्रशिक्षण घेतील आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करतील, ज्यातून त्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची तसेच देश आणि भारतीय लष्कराचा सन्मान

वाढवण्याचीही संधी मिळेल. देश आणि लष्करासाठी पदक मिळवण्याच्या संधीसोबतच, या युवती, अग्निवीर म्हणून नावनोंदणी करण्यासह, नॉन-कमिशन्ड अधिकारी म्हणून थेट प्रवेश आणि ज्युनियर कमिशन्ड अधिकारी म्हणून भरतीसाठीदेखील पात्र ठरतील.

हा उपक्रम केवळ तरुण महिला खेळाडूंनाच सक्षम करणार नाही तर स्त्री-पुरुष समानता आणि खेळांमधील सर्वसमावेशकतेचे महत्त्वदेखील अधोरेखित करणारा ठरेल. मुलींना क्रीडा क्षेत्रात येण्यासाठीचे अडथळे दूर करत, त्यांच्या प्रतिभांना नवे पंख देण्यासाठी, आर्मी स्पोर्ट्स गर्ल्स कंपनी एक दीपस्तंभ म्हणून काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content