Wednesday, February 5, 2025
Homeएनसर्कल6 कोटींची तस्करीत...

6 कोटींची तस्करीत सुपारी जप्त!

विशेष गुप्तचर आणि तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवाच्या जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस येथे नुकत्याच केलेल्या कारवाईत दहा कंटेनरमधली 112.14 मेट्रिक टन सुपारी (अरेका नट्स) जप्त केली. आयात कागदपत्रांमध्ये त्याची नोंद “बिटुमेन” अशी करत दिशाभूल करण्यात आली होती. या सुपारीची किंमत अंदाजे 5.7 कोटी रूपये आहे. या प्रकरणात अंदाजे 6.27 कोटी रूपयांचा कर चुकवण्यात आल्याचा संशय आहे.

सामान्यपणे बिटुमन ठेवले जाणाऱ्या कंटेनरमध्ये ही सुपारी ठेवल्याचं बारकाईनं तपासणी केल्यावर आढळले. सुपारीचे CTH 08028090 अंतर्गत योग्यरित्या वर्गीकरण केले आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी 110% अधिक एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST)ची उच्च दर मूल्य आणि शुल्क अशी त्याची संरचना आहे. त्यामुळे भारतात याची तस्करी करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. सामान्यपणे सुपारी पिशव्यांमधून आयात केली जाते तर बिटुमेन कंटेनरमधून. भारतातल्या कस्टम्स अधिकाऱ्यांना गुंगारा देण्यासाठी अरेका नटस कंटेनरमधल्या ड्रममधून आणले गेले होते.

विदेशी पुरवठादाराने संपूर्ण नियोजन आणि अंमलबजावणी केल्याचे यावरून दिसून येते. हे सुसंघटित आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्याचे द्योतक आहे. त्याचा छडा लावण्यासाठी एसआयआयबीच्या (आयात) पथकाने अथक परिश्रम घेतले. जवाहरलाल नेहरू बंदर, न्हावा शेवा येथे अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी हे पथक कार्यरत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सुपारी उत्पादक असूनही देशातील अवैध गुटखा उद्योगासाठी सुपारीची तस्करी केली जाते.

Continue reading

गडचिरोली मलेरियामुक्तीसाठी 1 एप्रिलपासून होणार खास प्रयत्न

महाराष्ट्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार मलेरियामुळे देशातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे....

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...
Skip to content