Homeन्यूज अँड व्ह्यूजस्मृती इराणींनी बौद्धांसाठी...

स्मृती इराणींनी बौद्धांसाठी केली 225 कोटींच्या 38 प्रकल्पांची पायाभरणी

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी काल हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेश लडाख या राज्यांमध्ये प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातील बौद्ध विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 225 कोटींच्या 38 प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीमार्फत पायाभरणी केली.

सध्याच्या सरकारच्या ‘विरासत के साथ विकास’ आणि ‘विरासत का संवर्धन’ या संकल्पना लक्षात घेऊन त्यांनी याप्रसंगी दिल्ली विद्यापीठाच्या बौद्ध अभ्यासातील प्रगत अभ्यास केंद्राला बळकट करण्यासाठी 30 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. हा निधी शैक्षणिक सहकार्यासाठी, संशोधनाला चालना देण्यासाठी, भाषेचे संवर्धन, प्रतिलिपींचे भाषांतर आणि बौद्ध धर्मियांच्या कौशल्य उन्नतीसाठी वापरला जाणार आहे.

‘विकसित भारत’च्या उद्देशाने केंद्रीय बौद्ध अभ्यास संस्था (CIBS), दिल्ली विद्यापीठाच्या बौद्ध अभ्यासातील प्रगत अभ्यास केंद्र आणि इतर प्रमुख संस्थांनी आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच बौद्ध सांस्कृतिक वारसा आणि ज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी एकत्रितपणे एकात्मिक विकासासाठी सहकार्य करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

नवी दिल्लीशिवाय हा कार्यक्रम संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातदेखील आयोजित करण्यात आला होता. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग, केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला, संबंधित राज्यांतील विविध मंत्री, संसद सदस्य, विधानसभेचे सदस्य आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेश लडाख या राज्यांमधील दुर्गम सीमावर्ती भागात प्रामुख्याने बौद्ध समुदायांवर विशेष लक्ष केंद्रित करून “संपूर्ण सरकार” दृष्टिकोनासह अल्पसंख्याकांच्या विकासासाठी भारत सरकारच्या वचनबद्धतेकडे आणखी एक पाऊल पुढे टाकत हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. या भागातील तरुण बौद्ध धर्मियांसाठी आधुनिक शिक्षणाच्या अतिरिक्त तरतूदीसह पारंपरिक धर्मशास्त्रीय शिक्षणाचे धर्मनिरपेक्षीकरण आणि व्यावसायिक तसेच कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने बौद्ध विकास योजना (BDP) यासारखे कार्यक्रम आखले आहेत.

हा कार्यक्रम मंत्रालयाच्या सध्या राबवल्या जात असलेल्या विविध योजना जशा प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम (PMJVK), प्रधानमंत्री-विकास, शिष्यवृत्ती यांच्यासह राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त प्राधिकरण (NMDFC) आणि इतर मंत्रालयांमधील संबंधित योजनांच्या एकत्रिकरणाने राबविण्यात येईल.  या सर्व योजना आणि कार्यक्रम पाच राज्यांमधील बौद्ध समुदायांच्या हिताच्या आहेत याची खात्री करण्यासाठी या कार्यक्रमात जागरूकता मोहिमेच्या तरतुदीचा समावेशही करण्यात आला आहे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content