Homeचिट चॅटश्री मावळी मंडळच्या...

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून गोपाळ लांडगे, अशोक वैती, देवराम भोईर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २९ एप्रिलला रात्री महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि डॉ. संजय नाईक उपस्थित राहणार आहेत.

यंदा संस्था शताब्दी वर्ष साजरे करीत असल्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात १०० संघाना प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेत पुरुष गटात ६८ संघानी व महिला गटात ३२ संघानी भाग घेतला आहे. स्पर्धेतील सामने बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी पुरुषांची ४ आणि महिलांची २ क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. कबड्डीप्रेमींना सामन्यांचा आनंद घेता यावा म्हणून खास प्रेषक गॅलरी उभारण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्व सामने सायंकाळच्या सत्रात होणार आहेत. संस्थेच्या शतक महोत्सवीवर्षानिमित्त छत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, दादोजी व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त मिळालेल्यांचा खास सत्कार करण्यात येणार आहे.

ह्या स्पर्धेत पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर ह्या जिल्ह्यातील नामवंत संघांचा सहभाग आहे. गतवर्षी पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळाने शिव शंकर क्रीडा मंडळाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. महिला गटात अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा पराभव केला होता. ह्या स्पर्धेत पुरुष गटात गतविजेते स्वस्तिक क्रीडा मंडळा (मुंबई उपनगर), सतेज संघ बाणेर, श्री शिवाजी उदय मंडळ, बदामी हौद संघ (सर्व पुणे), बाल मित्र मंडळ (पालघर), टी आय पी ल क्लब पनवेल (रायगड), जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिंद, शिव शंकर क्रीडा मंडळ कल्याण, ग्रीफिन्स जिमखाना नवी मुंबई (सर्व ठाणे), स्वस्तिक क्रीडा मंडळ, पार्ले स्पोर्ट्स क्लब, जय भवानी तरुण मंडळ (सर्व मुंबई उपनगर), बंड्या मारुती सेवा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स क्लब, शिवनेरी सेवा मंडळ, अमर हिंद मंडळ, गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (सर्व मुंबई शहर) ह्या बलाढ्य संघांचा समावेश आहे. महिला गटात शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब (धुळे), स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडेमी (चिपळूण), रा. फ. नाईक नवी मुंबई, शिवतेज क्रीडा मंडळ, ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब (सर्व ठाणे), स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब, महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब (सर्व मुंबई उपनगर), अमर हिंद मंडळ, विश्वशांती, डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब (सर्व मुंबई शहर) ह्या नामवंत संघांचा समावेश आहे.

Continue reading

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...

रतन टाटांची जयंती उत्साहात साजरी

रतन टाटांची जयंती केवळ स्मरणदिन न राहता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी व्हावी, अशी मागणी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार के. रवि (दादा) यांनी केली. देशाच्या औद्योगिक व सामाजिक प्रगतीत रतन टाटा यांचे अतुलनीय योगदान पाहता यंदा 28...

कतरिना आणि हृतिकचं परस्परविरोधी जग आलं सोबत!

आपल्या नवीन अभियानासाठी राडोने कतरिना कैफ आणि हृतिक रोशन या आपल्या दोन प्रसिद्ध जागतिक अम्बॅसडर्सना एका दृश्यात्मक क्रिएशनमध्ये एकत्र आणले आहे, ज्यात प्रत्येक बाबतीत परस्परविरोधी असलेली दोन जगं एकमेकांकडे आकृष्ट होतात व शेवटी एकत्र होतात. या दोन्ही कलाकारांशी केलेल्या...
Skip to content