Homeचिट चॅटश्री मावळी राज्यस्तरीय...

श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २५ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवजयंती उत्सवानिमित्त राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा शुक्रवार, २५-०४-२०२५ ते मंगळवार, २९-०४-२०२५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेत एकूण रू. ५,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. पुरुष गटात विजेत्या संघाला ₹ १,००,०००/-, उपविजेत्या संघाला ₹ ७५,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ २५,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५५,०००/-, उपविजेत्या संघाला ₹ ४४,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ २२,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष व महिला गटात उत्कृष्ट खेळाडूस ₹ १०,०००/-, उत्कृष्ट चढाईपट्टू खेळाडूस ₹ ५,०००/- व उत्कृष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ५,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस ₹ २,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे प्रवेशअर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय (ठाणे) व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या maharashtrakabaddi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे अर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय, ठाणे येथे शुक्रवार, १८/०४/२०२५पर्यंत स्वीकारले जातील.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content