Tuesday, September 17, 2024
Homeन्यूज ॲट अ ग्लांसशंकर आयएएस अकादमीला...

शंकर आयएएस अकादमीला ५ लाखांचा दंड

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारे दावे असलेली जाहिरात केल्याबद्दल शंकर आयएएस अकादमीला केंद्रीय ग३हक संरक्षण प्राधिकरणाने पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला असून ही जाहिरात तत्काळ बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.

शंकर आयएएस अकादमीने दिलेल्या जाहिरातीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022च्या संदर्भात खालील दावे केले आहेत.

  • 1. “अखिल भारतीय स्तरावर 933पैकी 336 जणांची निवड होणार”
  • 2. “सर्वोत्कृष्ट 100 उमेदवारांमध्ये 40 उमेदवार”
  • 3. “तामिळनाडूमधून 42 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 37 जणांनी शंकर आयएएस अकादमीमधून शिकवणी घेतली आहे,”
  • 4. “भारतातील सर्वोत्कृष्ट आयएएस अकादमी”

शंकर आयएएस अकादमीने विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची जाहिरात केली होती. मात्र या जाहिरातीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या निकालात, यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची माहिती जाणीवपूर्वक लपविण्यात आली होती, असे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला या जाहिरातींच्या परिक्षणांमध्ये आढळून आले. ही माहिती लपवल्याने, जाहिरात पाहण्याऱ्यांपर्यत असा संदेश पोहोचला की संस्थेने जे उमेदवार यशस्वी झाले आहे असा दावा केला आहे, त्या सगळ्यांनी या संस्थेने त्यांच्या संकेतस्थळावर ज्या सशुल्क अभ्यासक्रमांची जाहिरात केली आहे, तेच अभ्यासक्रम निवडले होते. दुसऱ्या शब्दांत म्हणायचे तर या जाहिरातीमुळे ग्राहकांची दिशाभूल होऊन ते संस्थेने जाहिरात केलेले सशुल्क अभ्यासक्रम खरेदी करण्याकडे आकृष्ट होतात.

शंकर आयएएस अकादमीने आपल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022च्या जाहिरातीमध्ये 336 उमेदवार यशस्वी झाल्याचा दावा केला होता. मात्र आपल्या उत्तरात त्यांना केवळ 333 यशस्वी उमेदवारांची माहिती सादर करता आली. या अकादमीने दावा केलेल्या 336 पैकी 221 विद्यार्थ्यांनी मोफत मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रम, 71 विद्यार्थ्यांनी मेन्स टेस्ट सीरिज, 35 विद्यार्थ्यांनी प्रीलिम्स टेस्ट सीरिज, 12 विद्यार्थ्यांनी जनरल स्टडीज प्रीलिम्स कम मेन्स, 4 विद्यार्थ्यांनी प्रीलिम्स टेस्ट सीरिजसह इतर काही मुख्य अभ्यासक्रम (पर्यायी आणि / किंवा सामान्य ज्ञानविषयक अभ्यासक्रम जीएस) घेतले होते. मात्र अकादमीच्या जाहिरीतीत अभ्यासक्रम निवडीबाबतची ही वस्तुनिष्ठ माहिती उघड केली गेली नव्हती. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली असल्याचे निरीक्षण ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोंदवले आहे.

ही अत्यंत महत्त्वाची माहिती लपवून अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीतून, उमेदवारांच्या यशात शंकर आयएएस अकादमीचा नेमका वाटा किंवा भूमिका काय हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे उमेदवार असलेल्या ग्राहकांना स्पष्टपणे कळत नाही आणि त्याउलट त्यांच्यावर या जाहिरातीचा दिशाभूल करणारा मोठा प्रभाव पडतो. एका अर्थाने या जाहिरातीमुळे व्यापार व्यवसायाच्या अनुचित पद्धतीपासून ग्राहकांना स्वतःचे संरक्षण करता यावे, याकरता त्यांना संपूर्ण माहिती देण्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाले असल्याचेही केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर होताच खाजगी शिकवणी संस्था लागलीच वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा भडीमार करायला सुरुवात करतात. त्यांच्या या जाहिरातींमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची नावे आणि छायाचित्रे ठळकपणे दाखवली जातात. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने महत्त्वाची माहिती लपवून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केलेल्या अनेक संस्थांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने असे निरीक्षणही नमूद केले आहे, की शिकवणी संस्था आपल्या जाहिरातींमध्ये एकसारख्या यशस्वी उमेदवारांची नाव आणि छायाचित्रे ठळकपणे वापरत आहेत, आणि संबंधित यशस्वी उमेदवार हे त्याच शिकवणी संस्थेतच प्रशिक्षण घेतलेले पूर्णवेळ विद्यार्थी होते अशा प्रकारचा आभास निर्माण करून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. या नोटीसांवर विविध शिकवणी संस्थांनी दिलेल्या उत्तरांचेही प्राधिकरणाने तपासणी केली. त्यात प्राधिकरणाला असे आढळून आले की परीक्षेत यशस्वी झालेल्या बहुतांश उमेदवारांनी, या शिकवणी संस्थांच्या केवळ मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये किंवा अशा संस्थांद्वारे दिल्या जाणाऱ्या विनामूल्य मार्गदर्शन सत्रांच्या कार्यक्रमांमध्येच सहभाग नोंदवलेला आहे. अनेक संस्थांनी यशस्वी झालेले काही उमेदवार आपलेच विद्यार्थी असल्याचा दावा केला आहे.

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content