Homeचिट चॅटशालिनीताई पै यांचे...

शालिनीताई पै यांचे निधन 

एक्साईज आणि कस्टममधील सेवानिवृत्त अधिकारी कृष्णा पै यांच्या अर्धांगिनी आणि बोरीवली येथील कलामहर्षी, ॲड आर्ट्सचे संस्थापक उदय पै यांच्या मातोश्री शालिनीताई कृष्णा पै यांचे वृद्धापकाळाने मुंबईतल्या बोरीवली येथील एका खाजगी इस्पितळात नुकतेच निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 समाजात अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाच्या शालिनीताई यांना बोरीवली येथे अतीशय मानाचे स्थान होते. मितभाषी आणि मनमिळावू स्वभाव हा आपल्या अपत्यांमध्येही आला असल्याने पै परिवार बोरीवली पंचक्रोशीत नावारुपाला आला. गेल्या काही दिवसांपासून शालिनीताई यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उदय पै आणि परिवाराने त्यांच्या शुश्रुषेत कोणतीही कसूर केली नाही. परंतु प्रकृती ढासळली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुरकर, आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत शालिनीताई पै यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content