Homeमुंबई स्पेशलशहीद साळसकर उद्यान...

शहीद साळसकर उद्यान ठरतेय विरंगुळ्याचे आकर्षण!

गोरेगाव (पूर्व)मध्ये मुलुंड जोड मार्गावर असलेले शहीद विजय साळसकर उद्यान गोरेगाव परिसरातील आबालवृद्धांसाठी विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. कोविड-१९ संसर्ग प्रतिबंधक निर्बंधांमध्ये शिथिलता देऊन उद्याने आणि मैदाने सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. तेव्हापासून या उद्यानातदेखील नागरिकांना विरंगुळा मिळू लागला आहे.

गोरेगाव पूर्वमधील मुलुंड जोडमार्गावर सुमारे ६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा अधिक विस्तीर्ण जागेवर साकारण्यात आलेले शहीद साळसकर उद्यान विविध प्राणी व पक्षी यांच्या संकल्पनेवर आधारित असून रंगबेरंगी फुलझाडे व हिरवळीने नटलेले आहे. विविध प्रकारच्या पुष्प वनस्पती याठिकाणी नागरिकांना सुखद अनुभव देत असतात. विस्तीर्ण परिसर आणि निरनिराळ्या सुविधा असल्याने या उद्यानास दररोज किमान २ हजारावर लहान मुले, नागरिक, ज्येष्ठ नागरिक भेट देत असतात.

या उद्यानात विविध मनोरंजनपर सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. उद्यानाची शोभा वाढविण्यासाठी व लहान मुलांच्या मनोरंजनाकरिता उद्यानात हत्ती, जिराफ, सिंह, वाघ, गेंडा, यासारख्या विविध प्राण्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आलेल्या आहेत. सोबत, येथील घसरगुंडी, झोपाळा, टिटर टॉटर, मंकी बार अशाप्रकाराची विविध खेळणीदेखील लहान मुलांसाठी नेहमी आकर्षण ठरत असतात.

आरोग्यदृष्ट्या चालण्याचा/धावण्याचा व्यायाम करणाऱ्या नागरिकांसाठी सुसज्ज असा जॉगिंग ट्रॅक या उद्यानात आहे. विविध प्रकारची व्यायामाचे साहित्य उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे. निवांत बसून एकमेकांशी संवाद साधता यावा, गप्पा मारता याव्यात म्हणून उद्यानात ठिकठिकाणी गजेबो बसविण्यात आले आहेत.

उद्यानात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणारी पाणपोई आहे. प्रसाधनगृह सुविधाही आहे. कोविड-१९ संसर्ग कालावधीमध्ये नागरिकांना प्रतिबंध असले तरी या उद्यानाची देखभाल योग्यरीत्या करण्यात येत आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यानंतर पुन्हा एकदा या उद्यानात नागरिकांची गजबज वाढली आहे. कोविड-१९ प्रतिबंधक निर्देशांचे संपूर्ण पालन करून नागरिकांना येथे विरंगुळा अनुभवता येईल आणि त्यांचे मनोरंजन होईल याची संपूर्ण काळजी उद्यान विभागामार्फत घेण्यात येत आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content