Homeपब्लिक फिगरऊसतोड कामगार कल्याण...

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला स्वतंत्र आर्थिक तरतूद!

राज्यात जोपर्यंत ऊस पिकेल तोपर्यंत उसतोडणी कामगारांच्या स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास निधीची कमतरता भासणार नाही, असे विधिमंडळात अभिमानाने सांगणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगार महामंडळाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

अर्थ खात्याकडून आर्थिक तरतूद करण्यासाठी महामंडळास आवश्यक असलेला स्वतंत्र लेखाशीर्ष (budget code) राज्याच्या महालेखापाल यांनी आज प्रदान केला आहे. ऊसतोड कामगारांच्या अनेक मागण्या व अनेक प्रश्न गेली अनेक वर्ष अनुत्तरित होते. मागील सरकारच्या काळात अनेकदा घोषणा होऊनही ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ प्रत्यक्षात अस्तित्त्वात आलेच नाही. धनंजय मुंडे यांनी मात्र स्वतःच्या खात्याकडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ वर्ग करून घेतल्यानंतर अत्यंत बारकाईने व अभ्यासपूर्ण पद्धतीने महामंडळाच्या संवैधानिक रचनेवर भर दिला आहे.

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्यास ऊस गाळपावर १० रू. प्रतिटन अधिभार लावण्यात येईल, त्यातून जी रक्कम जमा होईल, तेवढीच रक्कम राज्य सरकार देईल व यातून महामंडळाच्या विविध योजनांना निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर या महामंडळास उपलब्ध होणाऱ्या निधीची स्वतंत्र लेखाशीर्षाखाली उपलब्धता व्हावी यासाठी अर्थ खात्यामार्फत धनंजय मुंडे यांनी राज्याच्या महालेखापाल कार्यालयास लेखाशीर्ष निर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार भारतीय लेखा परीक्षा व लेखा विभागाने स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करण्यासंबंधीचा आदेश पारित केला आहे.

धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून अनेक वर्ष केवळ राजकीय चर्चेत राहिलेले ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ प्रत्यक्ष मूर्त स्वरूप घेत असून, ऊसतोड कामगार व वाहतूक कामगारांच्या विविध संघटनांनी मुंडे यांच्या या प्रयत्नांकडे सकारात्मक व आशावादी दृष्टिकोनातून पाहत असल्याचे याआधीही स्पष्ट केले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content