Homeचिट चॅटज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र...

ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र शिर्के यांना ‘फ्रेंड्स सर्कल’ जीवनगौरव पुरस्कार

पत्रकारिता, सामाजिक कार्य, प्रशासन आणि ग्रामीण सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या संस्थेच्या वतीने २०२५ सालचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक पुण्यनगरीचे मुंबई, ठाणे विभाग संपादक शैलेंद्र शिर्के यांना जाहीर झाला आहे. पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा मान देण्यात आला आहे.

संस्थेचे विश्वस्त अतुल होनकळसे यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल आणि केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय निवड समितीने पुरस्कारप्राप्त मान्यवरांची निवड केली.

अन्य पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे:

१) आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार राज्य पुरस्कार– किशोर आबीटकर, गारगोटी

२) दैनिक सागर संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार– वैभव पाटील, दैनिक पुढारी सातारा

३) मूकनायक वर्तमानपत्राचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर मूकनायक पत्रकारिता पुरस्कार- दत्तात्रय उकिरडे, अहिल्यानगर दै. सकाळ

४) साप्ताहिक ससेमिरा संपादक मधुकर लोंढे स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार- दीपक घोसाळकर, नवी मुंबई, दैनिक पुढारी

५) भंडारी समाज नेते शरददादा बोरकर ग्रामीण कार्यकर्ता राज्य प्रेरणा पुरस्कार– संतोष ढोरे, पनवेल वृद्धाश्रम सेवा

६) कर्तव्यदक्ष अधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार- सुनील आटपाडकर, एमएमआरडीए प्राधिकरणात सामाजिक विकास अधिकारी मुंबई

७) दलितमित्र रमाकांत आर्ते स्मृती सामाजिक कार्यकर्ता राज्य पुरस्कार– बजरंग सोनवणे, मुंबई

८) वरिष्ठ पत्रकार नवीन सोष्टे स्मृती विभागीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार- निलेश नवघरे, अकोट तालुका दैनिक तरुण भारत

९) मधु रावकर पत्रकार प्रेरणा पुरस्कार- दयानंद मांगले, देवगड

१०) जयानंद मठकर स्मृती विभागीय मराठी पत्रकार पुरस्कार- प्रकाश वळंजू, राजापूर

या पुरस्कारांचा वितरण सोहळा ७ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, शिवाजी चौक, जुने पनवेल येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई असणार असून सोहळ्याला राजकीय, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रामशेठ ठाकूर, नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, आमदार महेंद्रशेठ दळवी, विरोधी पक्षनेते प्रितमशेठ म्हात्रे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल संघटनेच्या केंद्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, राज्य अध्यक्ष विठ्ठल मोघे, माजी सभापती बाळासाहेब पाटील, आमदार विक्रांत पाटील व महेंद्रशेठ घरत (अध्यक्ष, रा. जि. काँग्रेस) यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन संजय पवार (पनवेल) यांनी केले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content