Homeचिट चॅटजयपूरमध्ये झाली दुसरी...

जयपूरमध्ये झाली दुसरी गिरनार एलिव्हेट समिट

गिरनार एलिव्हेट समिटच्या गतवर्षीच्या दणदणीत यशानंतर कारदेखो समूहाने या परिषदेचे दुसरे पर्व गिरनार एलिव्हेट समिट २०२४ नुकतेच आयोजित केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात कंपनीचे मुख्यालय असलेल्या जयपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसांच्या परिषदेचे उद्दिष्ट अमित जैन यांनी शार्क टँक इंडिया व अन्य माध्यमांतून गुंतवणूक केलेल्या ३०हून अधिक कंपन्यांचे सक्षमीकरण हे होते.

या परिषदेत विविध क्षेत्रांतील सत्रे घेण्यात आली. भारत २.० उभारण्याच्या दृष्टीने कंपनी संस्थापकांशी व्यक्तीश: जोडून घेण्याबद्दल तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याबद्दल जैन यांची सखोल बांधिलकी यातून अधोरेखित होते. गुंतवणूक केल्यानंतर कंपन्यांना वाढ व यश साध्य करण्यासाठी आवश्यक तो आराखडा आखण्यामध्ये मार्गदर्शन व मेंटॉरशिप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. गिरनार एलिव्हेट समिट या कंपन्यांना त्यांचे ज्ञान अधिक सखोल करण्यासाठी तसेच यशस्वी व्यवसाय उभे करण्याची धोरण सफाईदार करण्यासाठी उत्तम व्यासपीठ पुरवते.

गिरनार

कारदेखो समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अमित जैन म्हणाले की, माझे उद्दिष्ट पैशाच्या स्वरूपातील गुंतवणुकीच्या पलीकडे आहे. भारताच्या वाढत्या उद्योजक प्रतिभेची जोपासना करण्याच्या तसेच तिला मार्गदर्शन करण्याच्या बांधिलकीने मी प्रेरित आहे. त्याचप्रमाणे गाभ्याच्या स्थानी तंत्रज्ञान असलेल्या ‘नवभारताला’ संप्रेरणा देण्यासाठी वचनबद्ध आहे. संस्थापकांशी व्यक्तिगत संबंध जोडल्यामुळे त्यांची दृष्टी व आव्हाने समजून घेण्यात मदत होते असे मला वाटते. गिरनार एलिव्हेट समिटसारखे उपक्रम उद्योजकांना जाणवणारे अडथळे ओळखण्यास व त्यावर मात करण्यात संप्रेरकाची भूमिका पार पाडतात. त्यांना तज्ज्ञांकडून तसेच सहयोगींकडून शिकण्याची क्षमता देतात. त्याचप्रमाणे बाजारपेठेशी अनुकूल उत्पादने, निधीउभारणीची सुयोग्य धोरणे आणि बचावात्मक स्पर्धात्मक भंडार यासारखी महत्त्वाची अंगे विकसित करण्यासाठी आवश्यक उपाय अधिक सफाईने करण्यातही उद्योजकांना मदत करतात.

ब्रॅण्ड्सना सक्षम करून भारताच्या उद्योजकता परिसंस्थेत स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या कंपन्यांमध्ये त्यांचे रूपांतर करण्यात मदत करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. परिषदेच्या पहिल्या दिवशी उद्योजकांना व्यवसाय उभे करण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी आवश्यक ते बारकावे समजून घेण्याची संधी देणारी वैविध्यपूर्ण सत्रे घेण्यात आली. कारदेखो समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अमित जैन यांच्या व्यवसायांचा आवाका वाढवण्याविषयीच्या माहितीपूर्ण सत्राने परिषदेची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी कायदा, वित्तपुरवठा, नियमांचे पालन व एचआर (मनुष्यबळ विकास) या विषयांवरील सत्रे घेण्यात आली.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content