Homeएनसर्कलवृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक...

वृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक प्रशिक्षण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल कामगार, ठेकेदारांचे उद्यानतज्ज्ञ आणि पालिका अधिकाऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने वृक्षसंवर्धन व छाटणीचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. वृक्षतज्ज्ञ विवेक राणे यांनी टी-वॉर्ड येथील सभागृहात परिमंडळ पाच व परिमंडळ सहाच्या कार्यक्षेत्रासाठी हे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत सर्व ठेकेदार, त्यांचे उद्यानतज्ज्ञ, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, सहाय्यक उद्यान अधीक्षक तसेच परिमंडळ पाच आणि सहाचे उप उद्यान अधीक्षक उपस्थित होते.

वृक्षछाटणी

कार्यशाळेत वृक्षछाटणीच्या वैज्ञानिक पद्धती, झाडांच्या जोखमीचे मूल्यमापन करून अनावश्यक वृक्षतोड टाळण्याचे उपाय आणि असंघटित छाटणी टाळण्याच्या योग्य पद्धती शिकविण्यात आल्या. राणे यांनी थ्री-कट पद्धत, कॅनोपी कपात पद्धत तसेच इतर वृक्षसंवर्धन तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्षस्थळी झाडांचे मूल्यमापन कसे करावे आणि योग्यप्रकारे फांद्या कशा छाटाव्या याचे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content