Homeबॅक पेज‘फिजिक्‍सवाला’चे ‘स्‍कूल ऑफ...

‘फिजिक्‍सवाला’चे ‘स्‍कूल ऑफ मॅनेजमेंट’ सुरू!

फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू), या भारतातील आघाडीच्‍या एड-टेक व्‍यासपीठाने पीडब्‍ल्‍यू इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्‍हेशन (पीडब्‍ल्‍यू-आयओआय)च्‍या माध्‍यमातून आपला शैक्षणिक पोर्टफोलिओ वाढवत शिक्षणाला नव्‍या उंचीवर नेण्‍याचा प्रयत्न केला आहे. स्‍कूल ऑफ टेक्नॉलॉजी (एसओटी)ला मिळालेल्‍या भव्‍य यशाला अधिक पुढे घेऊन जात त्यांनी पीडब्‍ल्‍यू-आयओआय, हा नाविन्‍यपूर्ण तीन वर्षांचा यूजी रेसिडेन्शियल प्रोग्राम स्‍कूल ऑफ मॅनेजमेंट (एसओएम) लाँच केला आहे.

या प्रोग्रामच्या माध्यमातून व्‍यवस्‍थापन व तंत्रज्ञान क्षेत्रांमधील व्‍यवसाय व उद्योजकतेतील भावी लीडर्सना निपुण करण्‍याचा त्यांचा मानस आहे. एसओएम व्‍यवसाय, उद्योजकता व तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन या डायनॅमिक क्षेत्रांमध्‍ये यशस्‍वी होण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या दूरदर्शी व्‍यक्‍तींसाठी डिझाइन करण्‍यात आलेला हा सर्वसमावेशक प्रोग्राम आहे. अनुभवी शिक्षक व अव्‍वल कंपन्‍यांमधील उद्योगप्रमुख असलेला प्राध्‍यापकवर्ग, उद्योगकेंद्रित अभ्‍यासक्रम, जवळपास १०० टक्‍के स्‍कॉलरशिप्‍सची संधी आणि वास्‍तविक विश्‍वातील प्रकल्‍पांसह प्रत्‍यक्ष सहभाग यासह येथे विद्यार्थ्‍यांना यशस्‍वी व्‍यावसायिक प्रवासासाठी पूर्णपणे सुसज्‍ज केले जाते. हा प्रोग्राम वास्‍तविक जीवनातील आव्‍हानांचे नाविन्‍यपूर्ण पद्धतीने निराकरण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. तो विद्यार्थ्‍यांना रिअल-टाइम स्‍टार्टअप व उद्योग आव्‍हानांचे निराकरण करण्‍यास, तसेच संकल्‍पनांना कृतीत आणण्‍याकरिता ज्ञानाचा वापर करण्‍यास सक्षम करतो.

पीडब्‍ल्‍यूचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) आदित्‍य अग्रवाल म्‍हणाले की, या तीन वर्षांच्‍या प्रोग्रामसाठी आमचा दृष्टीकोन अगदी स्‍पष्‍ट आहे. तो म्‍हणजे दूरदर्शी लीडर्स तयार करणे, ज्‍यांना व्‍यवसाय क्षेत्रांबाबत सखोल माहिती असेल आणि आधुनिक व्‍यावसायिक आव्‍हानांचे प्रभावीपणे निराकरण करू शकतात. आमचे मिशन सोपे, पण पोटेण्‍ट आहे- विद्यार्थ्‍यांना व्‍यवसाय व तंत्रज्ञानाच्‍या डायनॅमिक क्षेत्रांमधील अद्वितीय यशासाठी सुसज्‍ज करणे.

एसओएम अभ्‍यासक्रम सर्वसमावेशक बाजारपेठेला आकार देणाऱ्या नवीन व्‍यवसाय व तंत्रज्ञान ट्रेण्‍ड्सशी संलग्‍न होण्‍याकरिता बारकाईने डिझाइन करण्‍यात आला आहे. यामध्‍ये तंत्रज्ञानाचा समावेश आहे, तसेच तो स्‍कूल ऑफ टेक्‍नॉलॉजी (एसओटी) सोबतच्‍या सहयोगाला चालना देतो. याव्‍यतिरिक्‍त, विद्यार्थ्‍यांना भारतातील किंवा परदेशातील पुढील शिक्षणासाठी आणि स्‍पर्धात्‍मक परीक्षांमध्‍ये पात्र ठरण्‍यासाठी पाथ वे प्रदान करत एकाच वेळी प्रतिष्ठित संस्‍थांमधून बॅचलर्स पदवी शिक्षण घेण्‍याचा पर्यायदेखील आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content