Homeबॅक पेजमहाराष्ट्राच्या जिल्हा युवा...

महाराष्ट्राच्या जिल्हा युवा पुरस्कारने सानिया खान सन्मानित

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांचा २०२३-२४चा जिल्हा युवा पुरस्कार (युवतीकरिता) सानिया मोहम्मद आरिफ खान हिला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल महाराष्ट्रदिनी प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, गौरवपत्र व दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एक मेच्या सोहळ्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात, पोलीस परेड ग्राउंड नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात सानिया खान यांना गौरविण्यात आले.

सानिया खान यांनी राष्ट्रीय विकास, आणि समाज सेवा क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल व सन २०२१ ते २०२४ या तीन वर्षांतील युवा विकासाचे कार्याची तपशील अहवाल जलज शर्मा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती नाशिक यांच्या टिप्पणीनुसार, तिच्या नावाची शिफारस राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४करिता सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिकतर्फे करण्यात आली.

२०२१ ते २०२४ या तीन वर्षांत सानिया खानने केलेल्या काही कार्याचा तपशिल-

४ जुलै २००३ रोजी नाशिक जिल्ह्यात जन्मलेल्या सानिया मोहम्मद आरिफ खान, नाशिक आणि मुंबईतील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये निर्भया कन्या अभियान प्रशिक्षण कार्यशाळेद्वारे महिला सक्षमीकरण – आपत्कालीन वेळी स्वसंरक्षणाचे तंत्र प्रशिक्षण ३०००हून अधिक तरुणींनी दिले.

२०२४:- भारत सरकार गृह मंत्रालय, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय नेहरू युवा केंद्र नाशिकद्वारे १५व्या आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रमाचे आयोजन. निर्भया कन्या अभियान शिबिरात झारखंड येथील १००, तेलंगणा ४०, ओरिसा ४०, आंध्र प्रदेश येथील २० असे एकूण २०० आदिवासी युवा-युवती व भारत सरकार नियुक्त ४० सी.आर.पी. एफ.च्या जवानांना तसेच नेहरू युवा केंद्र नाशिकचे आयोजन समिती सदस्य १० असे एकूण २५० सहभागी यांना दैनंदिन जीवनात अतिप्रसंगाच्या वेळी कशी काळजी घ्यावी, गुंड प्रवूत्तीच्या लोकांपासून कसा बचाव करावा याची प्रात्यक्षिके दाखवली. तिने महाविद्यालयीन, शालेय २२७५ तरुणांसाठी आपत्ती प्रतिसाद आणि जीवनरक्षक प्रात्यक्षिके सहप्रशिक्षण दिले.

३ ते ५ डिसेंबर नाशिक येथे आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातं आपत्कालीन व्यवस्थापन समितीत स्वयंसेवक.

२०१९पासून दरवर्षी Gateway Hotel (Taj Residency Nashik)” २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या नायकांच्या स्मरणार्थ विशेष स्मरण सेवेसाठी सर्व धार्मिक श्रद्धा प्रार्थना मेळाव्याचे आयोजन करिता निमंत्रण.

२१ जून २०२१ रोजी कोविड-१९ साथीच्या आजारात मृत्युमुखी पडलेल्या सहकाऱ्यांच्या सन्मानार्थ बहु-धार्मिक प्रार्थना सेवेचे आयोजन गेटवे हॉटेल तर्फे कार्यक्रम संपूर्ण भारतात प्रसारित केला गेला.

मार्च २०२४, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकारतर्फे इगतपुरी, नाशिक येथील व्यसनमुक्ती केंद्राच्या क्षेत्र निरीक्षणादरम्यान सुश्री सृष्टी चंद्रा, राज्य समन्वयक, यांच्या युवा सहाय्यक म्हणून मदत.

महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, विभाग, पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा कार्यक्रम नियोजन व उत्कृष्ट कामगिरी

पल्स पोलियो मोहीम जनसमूहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जनजागृती.

साहसी मोहीम महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, कळसूबाई शिखर आणि सह्याद्री पर्वतरांगा, ऐतिहासिक अंकाई किल्ला, रामशेज गड , ब्रम्हगिरी आणि दुर्गभंडार किल्ल्याचा ट्रेकिंगचे आयोजनासह तिरंगा फडकावला. २८३ तरुणांचे सहभाग.

२०२१ मध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत कोरोना महामारीच्या काळात घरातले मृत व्यक्तींचे, पूजनीय व्यक्ती, आई, वडील, प्रियजनांचे, स्वतःचे नावे वृक्ष लागवडीकरिता प्रोत्साहन, ३ वर्ष जतन करण्याचे आवाहन. वृक्ष लागवडचे आगळावेगळा उपक्रम लोकहितासाठी व देशासाठी सानिया यांनी एक नावीन्य दिशा लोकांना दिली. नाशिकसहित धारावी जिल्हा (पूर्वीचे नाव उस्मानाबाद ) येथे ३२ प्रकारचे ९६ वृक्ष लागवड करण्यात आले.

1 COMMENT

  1. Thanks a lot Kiran ji
    For Sania Khan’s news a motivational message for all youth who are working in this field or want to do innovative work for the national development and social work

Comments are closed.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content