Homeचिट चॅटघोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये...

घोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये साईनाथ आणि डॅशिंग उपांत्य फेरीत

साईनाथ स्पोर्ट्स आणि डॅशिंग स्पोर्ट्स या बलाढ्य संघांनी आपल्यापेक्षा तुलनेने कमजोर असणाऱ्या माटुंगा जिमखाना आणि युरोपेम यांच्यावर मोठे विजय मिळवून काल चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या दोन्ही संघांनी आपल्या तीनही साखळी लढती जिंकल्या आहेत.

डॅशिंगने युरोपेमचा पाच विकेट्सनी पराभव करताना त्यांच्या सर्व बाद ११५ या धावसंख्येचा पल्ला केवळ १६ षटकांत पार केला. युरोपेमच्या रिया पवारने (७१) आपले सलग तिसरे अर्धशतक ठोकले, पण ते व्यर्थ ठरले. तिशा नायर (२६/४) आणि राशी त्रिवेदी (१/२) यांच्या गोलंदाजीसमोर अन्य फलंदाजांचा निभाव लागला नाही.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेमचे पाठबळ लाभलेल्या या स्पर्धेमध्ये किंजल कुमारीचे प्रदर्शन सातत्यपूर्ण ठरत आहे. यष्टीरक्षक असणाऱ्या किंजलने माटुंगा जिमखान्याचे ६ बाद ८८ लक्ष पार करून देताना नाबाद ५२ धावा केल्या. उपांत्य फेरीत तिच्या कामगिरीवर साईनाथची भिस्त असणार आहे.

उपांत्य फेरीमध्ये साईनाथ स्पोर्ट्स विरुद्ध एमआयजी आणि डॅशिंग स्पोर्ट्स विरुद्ध नॅशनल अशा लढती ५ मार्चला माटुंगा जिमखाना येथे होतील.

संक्षिप्त धावफलक

युरोपेम- १७.५ षटकात ११५ (रिया पवार ७१, तिशा नायर २६/४, राशी त्रिवेदी १/२, निलाक्षी तलाठी १६/२)

पराभूत वि.

डॅशिंग स्पोर्ट्स- १६ षटकात ५ बाद ११६ (राशी त्रिवेदी ३०, खुशी निजाई २२, आर्या लोखंडे १९/२)

सर्वोत्तम खेळाडू- राशी त्रिवेदी

माटुंगा जिमखाना- २० षटकात ६ बाद ८८ (अनिषा कांबळे २०)

पराभूत वि.

साईनाथ स्पोर्ट्स क्लब- १२ षटकात २ बाद ९० (किंजल कुमारी नाबाद ५२)

सर्वोत्तम खेळाडू- किंजल कुमारी

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content