Homeपब्लिक फिगरयंदापासून महाराष्ट्रात सुधारित...

यंदापासून महाराष्ट्रात सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम

विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नावीन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे. या धोरणानुसार एआयसीटीई मान्यताप्राप्त व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल करुन शैक्षणिक वर्ष 2023-24पासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. राज्यात तंत्रशिक्षण विभाग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सध्याच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करुन शैक्षणिक वर्ष 2023-24पासून प्रथम सत्र प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम लागू करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सहा सत्रांचा अभ्यासक्रम डिसेंबर 2025पर्यंत टप्याटप्प्याने पूर्णपणे विकसित करण्यात येईल, असे ते म्हणाले.

तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात करण्यात येत असून एकूण 49 एआयसीटीई मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रमाकरिता प्रथम सत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच या अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ “K” Scheme या नावाने संबोधले जाणार आहे. हा अभ्यासक्रम परिणाम आधारित (Outcome Based) क्रेडिट सिस्टमवर आधारित असणार आहे. यामध्ये प्रत्येक सत्र हे 20-22 क्रेडिटचे असून एकूण सहा सत्रांचा पदविका अभ्यासक्रम 120-132 क्रेडिटचा असणार आहे.

औद्योगिक प्रशिक्षणामध्ये पूर्वीच्या अभ्यासक्रमात असलेल्या ६ आठवडयांचा कालावधी वाढवून आता 12 आठवड्यांचा करण्यात येत आहे. डिजिटल मीडिया MOOCs चा प्रभावी उपयोग करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमात अंतर्भाव असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकरिता योग आणि ध्यानसाधना, या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge System) विविध विषयांमध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संविधान (Indian Constitution) या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावण्याकरीता स्वयंअध्ययनाचे मूल्यांकन (Self Learning Assessment) होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मल्टीपल एन्ट्री – मल्टीपल एक्झिटची तरतूद करण्यात येत असून प्रथम वर्षाअंती एक्झिट करणाऱ्या विद्यार्थ्यांना Certificate of Vocation, व्दितीय वर्षांअंती एक्झिट करणाऱ्या  विद्यार्थ्यांना Diploma in Vocation व तृतीय वर्षांअंती Diploma in Engineeringची तरतूद करण्यात आलेली आहे. व्दितीय व तृतीय वर्षांच्या प्रवेशाकरिता मल्टीपल एन्ट्रीची तरतूद करण्यात येणार आहे. याचबरोबर उन्नत महाराष्ट्र अभियानातील उद्देशानुसार प्रादेशिक गरजांचा अभ्यास करून तंत्रज्ञानावर आधारित योजनांवर काम करण्याच्या दृष्टीने अभ्याक्रमात विशेष समावेश करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापर्ण शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधीसुद्धा अधिक उपलब्ध होतील, असे डॉ. मोहितकर यांनी सांगितले.

Continue reading

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा झाला भावूक!

गुवाहाटीत काल संध्याकाळी खेळल्या गेलेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानावर चाहत्यांचा प्रतिसाद पाहून रवींद्र जडेजा भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, रवींद्र जडेजा खलील अहमदचे चुंबन घेत असलेला एक व्हिडिओही सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. आयपीएल २०२६साठी राजस्थान...
Skip to content