Homeन्यूज ॲट अ ग्लांसनिवासी डॉक्टरांचा संप...

निवासी डॉक्टरांचा संप मागे!

पश्चिम बंगालमध्ये एका निवासी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याचा निर्णय झाल्यानंतर देशभरातल्या विविध रूग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी कालपासून सुरू केलेला संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने सार देश हादरला होता. प. बंगालमधल्या एका शासकीय रूग्णालयातल्या महिला प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची हत्त्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर प. बंगालमध्ये महिला सुरक्षित नाहीत, असा दावा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला होता. त्यावर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोपील पकडण्याची मुदत जाहीर केली होती. तसे झाले नाही तर आपण या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याकरीता तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते.

त्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी संघटनेने काल संप पुकारला होता. त्यानुसार काल देशभर निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. याच काळात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत नड्डा यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी घोषित केली. त्यानंतरनिवासी डॉक्टारांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये रूग्णांना उपचार मिळणार आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content