Homeमुंबई स्पेशलमुंबईत कचरा जाळणाऱ्यांची...

मुंबईत कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करा ‘८१६९६ ८१६९७’ या क्रमांकावर!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार पालिका कार्यक्षेत्रात कचरा जाळणे हा गुन्हा आहे. कचरा जाळणाऱ्यांविरोधात उपद्रव शुल्क आकारून दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. पालिका कार्यक्षेत्रात कोणी कचरा जाळताना आढळल्यास त्याची तक्रार “मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन ८१६९६ ८१६९७” या मदत सेवा क्रमांकावर नोंदवावी. तसेच, सोबत छायाचित्र जोडावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण आणि त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, मुंबई महापालिकेकडून निरनिराळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. पालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये परिणामकारक अशी विविध कामे होत आहेत. उपाययोजनांपलीकडे जाऊन वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवरही सक्‍त कारवाई केली जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण, व वातावरणीय बदल विभाग यांच्यामार्फत २६ ऑक्टोबर रोजी वायू प्रदूषण नियंत्रणासाठी राबवायची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यातील अनुक्रमांक ९मधील निर्देशांचे अनुपालन करण्याच्या उद्देशाने, पालिकेच्या “Chief Minister Clean Mumbai Helpline: 81696-81697” या व्हॉट्सॲप सेवा क्रमांकावरील तक्रार सादरीकरणाच्या टॅबमध्ये “कचरा जाळणे” / “Burning of Garbage” हा विकल्प अद्ययावत करण्यात आला आहे.

उघड्यावर कचरा जाळणे, हा पर्यावरणविषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे. त्यासाठी कायद्यात कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, नागरिक अनेकदा उघड्यावर कचरा जाळून विल्हेवाट लावतात आणि पर्यायाने कायद्याचे उल्लंघन करतात. कायद्यानुसार उघड्यावर कचरा जाळणे हे उपद्रवी कृत्य म्हणून गणले जाते. मात्र आता उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव म्हणाल्या की, मुंबई महानगर व परिसरात वायू प्रदूषणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनास सहकार्य करावे. कचरा जाळताना कोणी आढळल्यास त्याची तक्रार “Chief Minister Clean Mumbai Helpline: 81696-81697” या व्हॉट्सॲप सेवा क्रमांकावर ताबडतोब नोंदवावी. सोबत छायाचित्र जोडावे.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content