धर्मानुरागी जिनमती शाह यांचे काल मुंबईतल्या प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, स्नुषा, नातवंडे आदी मोठा परिवार आहे. जिनमती यांच्या पार्थिवावर दादर, शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी, प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, ब्रिच कॅंण्डी, ताडदेव परिसरातील उद्योजक, साहित्यिक, व्यापारी आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
जिनमती यांचे पुढील बेस्ना, उठामणा आदी तत्सम कार्यक्रम होणार नाहीत. त्या बारामतीतील प्रसिद्ध शेठ चंदुकाका सराफ यांची कन्या, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका बीना शाह यांच्या मातोश्री तसेच फलटणचे धनाढ्य व्यापारी व जैन समाजाचे आधारस्तंभ चंदुलाल शाह यांच्या पत्नी होत. मुंबईतून प्रसिद्ध होणारी अनेक दैनिक, साप्ताहिके व पाक्षिकांची छपाई त्यांच्या वरळीतील छपाई कारखान्यात केली जात असे. बोरीवली, संजय गांधी उद्यानातील पोदनपुरा या जैन मंदिराचे त्या संस्थापक विश्वस्त होत्या. त्यांनी काही एकर जमीन मंदिरास दानही केली आहे.

