Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या ३ तरण...

मुंबईतल्या ३ तरण तलावांसाठी बुधवारपासून नोंदणी

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अंधेरी (पूर्व), वरळी आणि विक्रोळी येथील तरणतलावांसाठी बुधवार, ६ मार्चला सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही नोंदणी होणार आहे. 

मुंबईकरांना पोहण्याची तसेच व्यायामाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रात पालिकेकडून तरण तलावांची सुविधा देण्यात आली आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शन व मान्यतेनुसार जे. बी. नगर मेट्रो स्थानकाजवळ, कोंडिविटा, अंधेरी (पूर्व), वरळी हिल जलाशय परिसर, वरळी आणि राजर्षि शाहू महाराज उद्यानाजवळ, टागोर नगर, विक्रोळी या तीन परिसरातील तरण तलावांसाठी नव्याने ऑनलाईन सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे. या तरण तलावासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सभासदत्व घेणाऱ्या सभासदांना तरण तलावाचे नियम व सुरक्षासंबंधी सर्व नियम यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची व वैद्यकीय प्रमाणपत्रांची पूर्तता केल्यानंतरच सदर सभासदत्व अंतिम होणार आहे, याची सर्व संबंधितांनी आवर्जून नोंद घ्यावी.

वरील तीनही तरण तलावांत सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुपये ८ हजार ८३६ इतके वार्षिक सभासदत्व शुल्क आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी, निवृत्त महानगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवक यांना शुल्कात सूट देत रुपये ४ हजार ५८६ इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे. पुरुषांसाठी या तीनही तरण तलावात पोहण्याची वेळ सकाळी ६ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० अशी असेल.

या तीनही तरण तलावात सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत महिलांसाठी विशेष बॅच असेल. या बॅचला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी वार्षिक सभासदत्व शुल्क हे रुपये ६ हजार ७१६ इतके आहे. शालेय विद्यार्थिनी, ज्येष्ठ महिला, दिव्यांग महिला, बृहन्मुंबई महानगरपालिका महिला कर्मचारी, निवृत्त महानगरपालिका महिला कर्मचारी आणि महिला नगरसेवक यांनादेखील रुपये ४ हजार ५८६ इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे, असे जलतरण तलाव आणि नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी कळविले आहे.

सभासदांसाठी महत्त्वाचे नियम व अटी

ऑनलाईन पद्धतीने सभासदत्व घेतलेल्या सभासदांनी त्याच्या प्रवर्गानुरूप खालील नमूद कागदपत्रे कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी (वय १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत अथवा इयत्ता दहावीपर्यंत) / वरिष्ठ नागरिक (वय ६० वर्षांवरील) प्रवर्गातील सभासदांना जन्मतारखेचा पुरावा सादर करावा लागणार आहे. तसेच महानगरपालिका कर्मचारी, नगरसेवकांना महानगरपालिकेचे ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. दिव्यांग नागरिकांनादेखील ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असल्याबाबतचे शासनमान्य प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

याशिवाय वय वर्षे तीन (दोन वर्षे पूर्ण) ते सहा वर्षे दरम्यानच्या सभासदांसमवेत त्या सभासदाची जबाबदारी घेणारे पालक किंवा पालकांनी नियुक्त केलेली व्यक्ती (जिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नाही) तरण तलावाची सभासद असणे आवश्यक आहे. हे सभासद पोहत असताना जबाबदारी घेतलेल्या सभासदाने त्याच्यासमवेत तरण तलावात उपस्थित राहणे (पाण्यात उतरणे) बंधनकारक आहे. जबाबदारी घेणाऱ्या सभासदाव्यतिरिक्त तरण तलावाची सुविधा उपभोगणारा सभासद आढळल्यास त्याचे सभासदत्व रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. वय वर्षे सात (सहा वर्षे पूर्ण) ते अठरा दरम्यान असणाऱ्या सभासदांसाठी पालकाने विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. 

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content