Homeडेली पल्सकडाक्याच्या थंडीतही शनिवारी...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने वाढत्या वीज मागणीनुसार पुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे उच्चांकी मागणीनुसार महावितरणला वीजपुरवठा करता आला. महावितरणकडे मुंबईचा बराचसा भाग वगळता संपूर्ण राज्यातील वीजपुरवठ्याची जबाबदारी आहे. महावितरणकडे शनिवारी २५,८०८ मेगावॅटची मागणी नोंदविली गेली. हा

विजेची

आतापर्यंतचा उच्चांक आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी २५,४१० मेगावॅट तर १४ एप्रिल २०२२ रोजी २५,१४४ मेगावॅट अशी उच्चांकी वीजमागणी नोंदविली गेली होती. या मोसमात पाऊस चांगला झाला असल्याने कृषी पंपांसाठी विजेची मागणी वाढली असल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

विजेच्या मागणीचा पॅटर्न लक्षात घेऊन महावितरणच्या संबंधित विभागाने यापूर्वीच वीजखरेदीचे करार केले होते. त्यानुसार शनिवारची उच्चांकी वीज मागणी पूर्ण करण्यात आली. महानिर्मितीकडून ६९९६ मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पांकडून ५२५२ मेगावॅट तर खासगी प्रकल्पांकडून ५७३३ मेगावॅट वीज उपलब्ध करण्यात आली. याखेरीज जलविद्युत प्रकल्पांमधून २००९ मेगावॅट, सौर उर्जा प्रकल्पांमधून ३०९३ मेगावॅट,  पवन उर्जा प्रकल्पांमधून २२८ मेगावॅट आणि सहविद्युत निर्मिती प्रकल्पांमधून २४९८ मेगावॅट वीज उपलब्ध झाली.

Continue reading

गोव्यात शुक्रवारपासून रंगणार आशियाई अजिंक्यपद अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स

१४वी अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात रंगणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आयोजनाखाली होणार असून या स्पर्धेत आशियातील अग्रगण्य जिम्नॅस्ट आपली कौशल्ये, नियंत्रण आणि कलात्मकता दाखवणार आहेत. स्पर्धैत...

वडिलांच्या स्टेम सेल्समुळे वाचले 9 वर्षीय मुलाचे प्राण

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 9 वर्षीय मुलाला कर्करोग झाल्यामुळे त्याच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. या संकटाच्या काळात त्याच्या वडिलांनी मुलाला स्टेम सेल्स देऊन त्याचे प्राण वाचवले, तर आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने...

जागतिक बाजारात साखरेचे दर 5 वर्षांतल्या नीचांकी पातळीवर!

जागतिक साखर बाजारात एक मोठी उलथापालथ झाली असून, साखरेचे दर गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर कोसळले आहेत. ICE एक्सचेंजमधील कच्च्या साखरेचा वायदे भाव (Raw Sugar Futures) 14.37 सेंट्स प्रति पाऊंड इतका खाली आला आहे, ही एक अशी पातळी आहे,...
Skip to content