Homeचिट चॅट१२ ऑगस्टपासून रॅपीडो...

१२ ऑगस्टपासून रॅपीडो कॅरम सुपर ६ स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा आपले ७०वे वर्ष साजरे करत असून त्यानिमित्ताने सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्या सहकार्याने इंडियन ऑइल व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत राज्यातील पहिली रॅपीडो कॅरम सुपर ६ स्पर्धा १२ ते १४ ऑगस्टदरम्यान सूर्यवंशी सभागृह, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई- २८ येथे आयोजित करण्यात आली आहे.

पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा २ गटात ही स्पर्धा रंगणार असून प्रत्येकी ६ बोर्डाचे तीन सेट खेळविण्यात येणार आहेत. शिवाय डायरेक्ट प्रतिस्पर्ध्याची सोंगटी चढविण्यात येणार नसल्याने कमी कालावधीत प्रेक्षकांना अधिक आक्रमक खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाचे प्रथम पारितोषिक ७० हजार रूपयांचे असून महिला एकेरी गटातील विजेतीला ३५ हजारांचे रोख बक्षिस देण्यात येणार आहे.

प्रत्येक गटातील पहिल्या ८ खेळाडूंना मिळून एकंदर २ लाख ७० हजारांच्या ईनामांची बरसात खेळाडूंवर होणार आहे. या सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्यूब चॅनलवरून करण्यात येणार असल्याने कॅरम रसिकांना या आक्रमक खेळाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. क्रिकेटमध्ये टेस्ट, वन डे आणि २०-२० असे सामने रंगतात. त्याचप्रमाणे कॅरममध्येही राज्यात यापुढे अशा प्रकारचे सामने आयोजित केले जाणार आहेत. १४ ऑगस्टला महाराष्ट्र कॅरम असोसिशनचा ७०वा वर्धापनदिन असून या दिवशी सायंकाळी राज्यातील कॅरम खेळाडू, पंच, पदाधिकारी मिळून वाद्यवृंद सादर करणार आहेत.

या स्पर्धेचे प्रवेश अर्ज www.maharashtracarromassociation.com या महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या वेबसाईटवर उपलब्ध असून खेळाडूंनी आपली नावे ३१ जुलै २०२४पर्यंत आपल्या जिल्ह्यांमार्फात महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९वर संपर्क साधावा.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content