Homeएनसर्कलमध्य भारताला पावसाने...

मध्य भारताला पावसाने झोडपले, बिहारमध्ये दोन दिवसांत ८२ बळी!

भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मुसळधार पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही जीवितहानी झाली आहे. बिहार सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे.

गेले दोन दिवस बिहारच्या नालंदा आणि आसपासच्या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. नालंदा जिल्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मतदारसंघ आहे. बुधवारी झाडे तसेच विजा कोसळून बिहारमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. काल अशाच घटनांमध्ये ६१ जणांचा बळी गेल्याचे बोलले जाते. येत्या तीन दिवसांत तेथील हवामानात काडीचाही बदल होण्याची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. नागरिकांनी सतर्क राहवे, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, उत्तराखंडमध्येही काल तुफान वृष्टी झाल्यामुळे चमोली परिसरातील पाण्याचे लोट आणि त्याबरोबर वाहून जाणारा गाळ नंदप्रयाग बाजारापर्यंत पोहोचला. आज सकाळी तेथे मदतकार्य करताना रस्त्यावरील चिखल दूर करून ते मोकळे केले जात होते.

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content