Homeपब्लिक फिगरपरदेशात भाषणे ठोकणाऱ्या...

परदेशात भाषणे ठोकणाऱ्या राहुल गांधींना ही माहिती नाही?

मुळात ईव्हीएम मशीन कुठल्याही मोबाईलला जोडला जात नाही. कोणताच ईव्हीएम मोबाइलनं ऑपरेट होत नाही. राहुल गांधी परदेशात टेक्नॉलॉजीवर भाषणं देतात. त्यांना याची माहिती नाही का?, असा सवाल शिवसेनेचे उपनेते संजय निरूपम यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी निवडून आल्यानंतर वायकर यांच्या मेव्हण्याने निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. राहुल गांधी, अदित्य ठाकरे अखिलेश यादव यांनी तसे ट्विटही केले आहे. त्यानंतर निरूपम यांनी हे आरोप फेटाळून लावले.

राहुल

ईव्हीएम मोबाईलने अनलॉक केला गेला असे सांगितले जात आहे. निकालाच्या दिवशीदेखील असेच खोटे आरोप करण्यात आले. दोन हजार मतांनी अमोल कीर्तिकर जिंकले असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. यानंतर ईव्हीएम मशीनवर कीर्तिकर याना एक मत जास्त मिळाले म्हणून ते विजयी  म्हणून घोषणा करण्यात आली. हे सारे माध्यमांवर चालू होते. त्यावेळी पोस्टल मते मोजण्यात आलेली नव्हती. पोस्टल मते मोजल्यावर वायकर विजयी झाल्याचे स्पष्ट झाले, असे त्यांनी सांगितले.

कोणीतरी तिथे मोबाईल घेऊन गेले होते असे सांगण्यात आले आहे. आता हा मोबाईल कुणाचा होता? वायकर यांच्या मेहुण्याचा आहे का? याची चौकशी करायला हवी. एक ईव्हीएम मशीन या मोबाइलला जोडण्यात आले होते. त्यावर ओटीपी आला होता. मूळात ईव्हीएम मोबाईलला जोडताच येत नाही. त्याला इंटरनेट नसते. त्यामुळे ओटीपीने ते ऑपरेटच करता येत नाही. ज्यांना पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे तेदेखील असे बोलतात हे हास्यास्पद आहे, असे निरूपम म्हणाले.

Continue reading

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...
Skip to content