महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाच्या उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास विभागाने दिली आहे.
अल्पसंख्याकांना संविधानाने दिलेल्या हक्काचे संरक्षण करणे, अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांचा अभ्यास करून उपाययोजनांबाबतीत शासनाला शिफारस करणे अशा स्वरुपाची कामे या आयोगाकडून केली जातात. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ आयोगाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पुढील 5 वर्षांकरिता असतो.