Friday, September 20, 2024
Homeहेल्थ इज वेल्थलसीच्या एका डोसने...

लसीच्या एका डोसने मिळणार दोन जीवांना सुरक्षितता!

कोविड-19च्या दुसऱ्या लाटेत गरोदर महिलांच्या वाढत्या मृत्यूमुळे यादिशेने चर्चा सुरू झाली. दुसऱ्या लाटेत, कोविड-19 बाधित गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट होते. अशा परिस्थितीत कोविड-19 लसीचा लाभ गरोदर महिलानांही मिळायला हवा असे जाणवले. गरोदर महिलांच्या बाबतीत हा दोन जीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो. एक म्हणजे ती माता आणि दुसरा जीव म्हणजे गर्भातील बाळ. म्हणूनच देशाने गरोदर महिलांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला, असे लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड-19 कार्यकारी गटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी डीडी न्यूजशी संवाद साधताना सांगितले.

या लसीमुळे या महिलांना अधिक लाभ होईल. कोरोनाची भीती आणि चिंता यापासून त्या मुक्त राहतील. गरोदर महिलांच्या लसीकरणामुळे तिच्या उदरात वाढणारा गर्भही यापासून सुरक्षित ठेवता येऊ शकतो. गरोदर महिलेमध्ये प्रतिकारक्षमता विकसित झाल्यास तिच्या गर्भालाही ही सुरक्षितता प्राप्त होते. लसीचा प्रभाव आणि मातेच्या शरीरात निर्माण झालेली प्रतिकारक्षमता, बालकाच्या जन्मापर्यंत त्याच्याकडे राहते, असेही ते म्हणाले.

गरोदर महिलांसाठी लसीची सुरक्षितता

गरोदर महिलांचे लसीकरण करायला हवे, कारण केवळ मातेच्या शरीरातच नव्हे तर गर्भामध्येही यामुळे प्रतिकारक्षमता निर्माण होते, असा विचार संपूर्ण जगभरात आहे. एकंदरीत आपल्या लसी सुरक्षित आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिका यासारख्या पाश्चिमात्य देशात mRNA लस दिली जात आहे. गरोदर महिलांचे लसीकरण केले जात आहे. ही बाब आणि  आकडेवारी लक्षात घेऊन आपल्या देशात गरोदर महिलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या तीन महिन्यांत बाळाचे शरीर आकार घेत असल्याने या काळात गरोदर महिलांना लस देण्याबाबत काही जणांनी शंका आणि भीती व्यक्त केली होती. या शंकेचे निरसन करताना डॉ अरोरा यांनी, गरोदर  महिला आणि गर्भासाठीही लस सुरक्षित असल्याचे सांगत त्यांना आश्वस्त केले. आपल्या लसीमध्ये, जिवंत विषाणू नाही, जो संसर्गाला कारणीभूत ठरू शकेल. त्यामुळे अशी भीती निरर्थक आहे. लसीमुळे मातेच्या उदरातल्या गर्भावर कोणताही वाईट परिणाम होईल असे दिसत नाही असे ते म्हणाले.

लसी

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लस घेणाऱ्या गरोदर महिलेच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यात येईल. देशात लस घेणाऱ्या गरोदर महिलांना, अस्वस्थतेच्या चिन्हाबाबत नेटवर्कच्या माध्यमातून  देखरेख ठेवण्यात येईल. गर्भाच्या वाढीवरही लक्ष ठेवण्यात येईल. यातून आपल्या माता, भगिनी लसीकरणानंतर संपूर्णपणे सुरक्षित असल्याची खातरजमा होईल, असे ते म्हणाले.

गरोदर महिलांना लसीकरणानंतर जाणवणाऱ्या साईडइफेक्टबाबत बोलताना डॉ. अरोरा म्हणाले की, 10 लाख महिलांमध्ये एका महिलेला रक्तस्त्राव किंवा गुठळी निर्माण झाल्याची समस्या अनुभवाला आली आहे. तीव्र डोकेदुखी, डोकेदुखीसह उलटी, उलटीच्या भावनेसह पोटदुखी किंवा श्वासाला त्रास अशी लक्षणे दिसू शकतात. ही तीन ते चार लक्षणे आढळून येऊ शकतात. सामान्यतः लसीकरणानंतर तीन ते चार आठवड्याच्या कालावधीत ही लक्षणे दिसून येऊ शकतात. अशावेळी गरोदर महिलेच्या कुटुंबियांनी त्या महिलेला, जिथे तिचे लसीकरण झाले त्या रुग्णालयात त्वरित न्यावे. रुग्णालयात याचे कारण शोधून तिला आवश्यक ते उपचार पुरवता येतील.

गरोदर महिला लसीची मात्रा कधी घेऊ शकते?

गरोदर महिला कधीही लस घेऊ शकते. गरोदर असल्याचे निदान झाल्यापासून कोणत्याही वेळी या महिलांना कोविड-19 लस देता येऊ शकते. पहिल्या तीन महिन्यांत, दुसऱ्या किंवा तिसऱ्या, तीन महिन्यांत लस दिल्याने काहीही फरक पडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात

अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट...

मोटोरोलाने लाँच केला ‘रेडी फॉर एनीथिंग’!

मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात आली आहे, ज्यात शक्तिशाली वैशिष्ट्यांसह आकर्षक, कमीतकमी डिझाइनचा समावेश आहे. ज्यात 'रेडी फॉर एनीथिंग' ही टॅगलाइन समाविष्ट आहे. हे उपकरण जास्तीतजास्त...
error: Content is protected !!
Skip to content