Homeपब्लिक फिगरपंतप्रधान मोदींना ‘ग्रँड...

पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ पुरस्कार!

ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटेरिना साकेलारोपौलो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ पुरस्कार प्रदान केला. ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्काराची सुरुवात 1975 मध्ये झाली. या पुरस्कारावर तारकेच्या समोरच्या बाजूस देवी अथेनाचे मस्तक कोरलेले असून केवळ सदाचारींना सन्मानित केले जावे अशा अर्थाचे वचनदेखील लिहिलेले आहे.

ग्रीसच्या राष्ट्रपतींनी आजवर देशाचा सन्मान वाढवण्यात योगदान देणारे ग्रीसचे पंतप्रधान आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ प्रदान केला आहे. या पुरस्काराच्या पत्रकात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतातील मैत्रीभाव जपणाऱ्या लोकांचा सन्मान केला जात आहे.

या भेटीच्या निमित्ताने, अथकपणे आपल्या देशाची जागतिक पोहोच वाढवणाऱ्या, भारताच्या आर्थिक प्रगती आणि समृद्धीसाठी पद्धतशीरपणे काम करणाऱ्या आणि धाडसी सुधारणा घडवून आणणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांचा ग्रीक राज्य सन्मान करते, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान एक मुत्सद्दी राजकारणी आहेत,  ज्यांनी पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल या मुद्दांना आंतरराष्ट्रीय क्रियाकलापांच्या सर्वोच्च प्राधान्यांमध्ये जागा मिळवून दिली आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

परस्पर हिताच्या क्षेत्रात ग्रीक-भारतीय मैत्रीच्या धोरणात्मक वाढीच्या कामात पंतप्रधान मोदी यांच्या निर्णायक योगदानाचीही दखल घेण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटेरिना साकेलारोपौलो, ग्रीसचे सरकार आणि ग्रीसची जनता यांचे आभार मानले आणि ते एक्स वर पोस्ट केले आहे.

Continue reading

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा झाला भावूक!

गुवाहाटीत काल संध्याकाळी खेळल्या गेलेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानावर चाहत्यांचा प्रतिसाद पाहून रवींद्र जडेजा भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, रवींद्र जडेजा खलील अहमदचे चुंबन घेत असलेला एक व्हिडिओही सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. आयपीएल २०२६साठी राजस्थान...

बिहारच्या नालंदात शीतलामाता मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ परिसरातील माता शीतला मंदिरात मंगळवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. यात किमान ९ भाविक ठार, तर इतर अनेक जखमी झाले आहेत. चैत्र महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने व महावीर जयंतीमुळे मंदिरात प्रचंड गर्दी जमली होती. बॅरिकेड्स तुटल्याने...

‘के-पॉप’चे पुनरागमन! एप्रिलपासून ‘अरिरांग’ आणि कॉन्सर्टचे तब्बल ८२ शो!

जगप्रसिद्ध के-पॉप बँड बीटीएसचे सातही सदस्य- आरएम, जिन, सुगा, जे होप, जिमिन, व्ही आणि जंग कुक हे जवळपास चार वर्षांच्या खंडानंतर 21 मार्च रोजी सोलच्या ग्वानहवामुन चौकात एकत्र आले. त्यांनी 'बीटीएस दी कमबॅक लाईव्ह अरिरांग' या भव्य मोफत कॉन्सर्टने...
Skip to content