Homeचिट चॅटपंतप्रधान मोदींच्या अमेरिका...

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीने टेक एडसाठी अतुलनीय संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीने भारताच्या टेक एडच्या प्रगतीसाठी अतुलनीय संधी निर्माण होतील आणि सहकार्य, भागीदारी आणि गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध करून देईल, असे इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय)ने म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या संधी खुल्या झाल्या आहेत. स्टार्ट-अप्सचा प्रसार आणि रोजगारनिर्मिती झाली आहे. स्टार्ट-अप्सचा प्रसार आणि रोजगार निर्मिती हा तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढ आणि विकासाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. नवनिर्मितीला गती देण्यात, उद्योजकतेला चालना देण्यात आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात स्टार्ट-अप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. डिजिटल पब्लिक गुड्सच्या निर्मितीमध्ये भारत जगात अग्रणी म्हणून उदयास आला असून त्यामुळे क्षमता खुली होईल आणि सर्वसमावेशक डिजिटल अर्थव्यवस्थेच्या निर्मितीला चालना मिळेल.

हे दशक “भारताचे टेक एड” असेल असे पंतप्रधानांनी २०२१मध्ये घोषित केले होते आणि त्यांच्या या वचनबद्धतेशी सुसंगत अमेरिका दौऱ्यादरम्यान आकारास आलेल्या सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी ऐतिहासिक आणि प्रवाही दोन्ही आहेत. त्यामुळे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीत अतुलनीय भर पडली आहे. या भेटीमुळे संरक्षण, अवकाश, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, दूरसंचार आणि कॉन्सुलर सेवा या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताचे १ ट्रिलियन डॉलरच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन, या दोघांनी केलेल्या घोषणांचे स्वागत करताना आयएएमएआयचे अध्यक्ष हर्ष जैन म्हणाले की, खुल्या, सुलभ आणि सुरक्षित तंत्रज्ञान परिसंस्थेला चालना दिल्याने भारताच्या संपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्थेची क्षमता वाढेल. तंत्रज्ञानामध्ये प्रचंड गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीने हा भारतासाठी केवळ एक ऐतिहासिक क्षणच नाही, तर उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय आयपी तयार करण्याची संधी आहे. त्यामुळे संपूर्ण परिसंस्थेचा कायापालट होईल. आयएएमएआय सदस्यांना भारत आणि अमेरिकेमधील उद्योग, सरकार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सहविकास आणि सह-उत्पादन संधी, तंत्रज्ञानाचे अधिक सामायिकरण यातून निश्चितच फायदा होईल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content