Homeटॉप स्टोरीचीनची डोकेदुखी वाढवणाऱ्या...

चीनची डोकेदुखी वाढवणाऱ्या सेला बोगद्याचे पंतप्रधान मोदींनी केले लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे लोकार्पण केले. विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमांतर्गत सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील तवांगला आसामच्या तेजपूरशी जोडणाऱ्या रस्त्यावर 13,000 फूट उंचीवर बांधला आहे. एकूण 825 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा बोगदा बलीपारा-चरिदुआर-तवांग रोडवरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. त्यामुळे सशस्त्र दलांची सज्जता वाढेल आणि सीमावर्ती भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. या बोगद्यामुळे चीनची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जाते.

उद्घाटन समारंभाला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते.

आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, सेला बोगदा सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि तवांगच्या लोकांसाठी प्रवास सुखकर करेल. ईशान्य प्रदेशात अनेक बोगद्यांचे काम सुरू आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर देशाच्या गरजेनुसार काम करण्याची आपली शैली आहे. आपल्या पुढील कार्यकाळात अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असलेल्या या ठिकाणी भेटायला येऊ.

सेला बोगदा नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून बांधण्यात आला आहे आणि त्यात सर्वोच्च मानकांची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हा प्रकल्प या प्रदेशात केवळ जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान करणार नाही तर देशासाठी सामरिकदृष्ट्यादेखील महत्त्वाचा आहे. या बोगद्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते 9 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली आणि 1 एप्रिल 2019 रोजी बांधकामाला सुरुवात झाली. कठीण भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानासारख्या आव्हानांवर मात करून हा बोगदा अवघ्या पाच वर्षांत बांधून पूर्ण झाला आहे. सीमावर्ती भागाच्या विकासात बीआरओ नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गेल्या तीन वर्षांत, बीआरओ ने 8,737 कोटी रुपये खर्चून  विक्रमी 330 पायाभूत सुविधा प्रकल्प बांधून पूर्ण केले आहेत.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content