Homeबॅक पेजराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ओदिशात तीन नवीन रेल्वे सुरू!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ओदिशामधील बदमपहार रेल्वे स्थानकावरून तीन नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. बदमपहार–टाटानगर मेमू, बदमपहार–रुरकेला साप्ताहिक एक्सप्रेस, आणि बदमपहार-शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस, या गाड्यांचा यात समावेश आहे.

त्यांनी यावेळी रायरंगपूर येथील नवीन टपाल विभागाचे उद्घाटन केले, तसेच त्याच्या स्मरणार्थ रायरंगपूर टपाल विभागाचे विशेष टपाल पाकीट प्रकाशित केले आणि बदमपहार रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली.   

यावेळी आयोजित समारंभाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एखाद्या प्रदेशाचा विकास हा तेथील दळणवळणाच्या सुविधांवर अवलंबून असतो. मग रेल्वे असो, अथवा टपाल सेवा, या सर्व सेवा लोकांचे जीवन सुकर करतात. त्या म्हणाल्या की, आज सुरू झालेल्या तीन गाड्या स्थानिक जनतेला झारखंड आणि पश्चिम बंगालसारख्या शेजारच्या राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी उपयोगी ठरतील. त्यांनी सांगितले की, यामुळे ओदिशामधील रुरकेला या औद्योगिक शहराला भेट देणाऱ्या लोकांची गैरसोयही होणार नाही. 

राष्ट्रपती म्हणाल्या की, सेल फोन आणि कुरिअर सेवांचा वाढता वापर असूनही, भारतीय टपाल विभागाने आपली काल-सुसंगतता गमावलेली नाही. रायरंगपूर येथील नवीन टपाल विभाग या प्रदेशासाठी महत्वाचा ठरेल. या भागातील लोकांना आता टपाल सेवा सहज उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे, असे सांगत, 2013-14 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत चालू अर्थसंकल्पात जवळजवळ तिप्पट वाढ झाल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. त्या म्हणाल्या की, आदिवासींच्या विकासाशिवाय सर्वसमावेशक विकास अपूर्ण आहे, आणि त्यासाठी सरकार आदिवासी समाजाच्या विकासाला प्राधान्य देत आहे. आदिवासी युवकांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वतःचा विकास साधायचा असेल, तर प्रयत्न आवश्यक आहेत, आणि म्हणूनच युवकांनी जीवनात पुढे जायचा सातात्त्याने प्रयत्न करायला हवा, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content