Homeचिट चॅटस्वा. सावरकर स्मारकाच्या...

स्वा. सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदी प्रवीण दीक्षित यांची फेरनिवड

मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची एकमताने फेरनिवड झाली.

स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सदस्यांच्या रविवार, २५ डिसेंबर २०२२, या दिवशी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारिणीतील नव्या सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये विद्यमान सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.

कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये स्मारकाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची तसेच कार्याध्यक्षपदी रणजित सावरकर, कोषाध्यक्षपदी मंजिरी मराठे, कार्यवाहपदी राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाहपदी स्वप्निल सावरकर यांची एकमताने फेरनिवड केली गेली. ही निवड तीन वर्षांसाठी आहे.

सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये कार्यकारिणी सदस्यांची एकमताने निवड केली गेली. नवनिर्वाचित कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे.

कार्यकारिणी सदस्य (आश्रयदाता विभाग)- के. सरस्वती, विज्ञानेश मासावकर, अभय जोशी, कमलाकर गुरव.

कार्यकारी सदस्य (सामान्य विभाग)- चंद्रशेखर साने (पुणे), दीपक कानुलकर, डॉ. अमित नाबर, चिरायू पंडित (वडोदरा), भाग्यश्री सावरकर (पुणे).

उपरोक्त कार्यकारिणी सदस्यांमध्ये (सामान्य विभाग) पहिल्यांदा निवडून आलेल्या दीपक कानुलकर, डॉ. अमित नाबर, चिरायू पंडित (वडोदरा) आणि भाग्यश्री सावरकर (पुणे) या नव्या पिढीतील सदस्यांचा समावेश आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content