Homeएनसर्कलपूजा खेडकर केव्हाही...

पूजा खेडकर केव्हाही होऊ शकतात गजाआड

अपंगत्वाच्या बनावट कागदपत्रांद्वारे आयएएस केडर मिळवणाऱ्या वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची उमेदवारी युपीएससीने रद्द केल्यापाठोपाठ दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जदेखील फेटाळला. त्यामुळे पूजा खेडकर यांना कधीही अटक होऊ शकते.

पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएसीकडून बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पूजा यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केले होते. प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होत्या. मात्र, आपल्या महागड्या ऑडी गाडीला दिवा लावल्याने तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याच्या अँटीचेंबरमध्ये कार्यालय थाटल्याने वाद निर्माण झाला होता.

खेडकर यांच्याविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला पाठवला होता. त्यानंतर अपंगत्वाचे बनावट कागदपत्र सादर करत युपीएससीची फसवणूक करत पूजा यांनी आयएएस केडर मिळवल्याचे स्पष्ट झाले होते. सात वेळा नावात बदल करत पूजा यांनी तब्बल ११ वेळा युपीएससीची परीक्षा दिली होती. याची दखल पूजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर अटकपूर्व जामीनासाठी पूजा यांनी पटियाला कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने पूजा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

पात्र नसताना चुकीच्या पद्धतीने त्यांनी सूट मिळवली, अशा लोकांचा शोध घेण्यासही कोर्टाने युपीएससीला सांगितले. तसेच पूजा खेडकरला यूपीएससीमधील कोणी मदत केली आहे का? याचाही तपास करण्याचे कोर्टाने पोलिसांना निर्देश दिले आहेत. दरम्यान, पूजा यांना जामीनासाठी दिल्ली हायकोर्टात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content