Homeएनसर्कलफिजिक्‍सवालाने वर्षभरात केले...

फिजिक्‍सवालाने वर्षभरात केले १ लाख तरूणांना अपस्किल

भारतातील आघाडीचा एड-टेक प्‍लॅटफॉर्म फिजिक्सवालाचे स्किलिंग व्‍हर्टिकल पीडब्‍ल्‍यू स्किल्‍सने आपल्‍या पदार्पणीय वर्ष २०२३मध्‍ये १ लाख विद्यार्थ्‍यांना अपस्किल केले आहे. यामध्‍ये बहुतांशकरून १८ ते २५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे. पीडब्‍ल्‍यू स्किल्‍स विद्यार्थ्‍यांना विविध प्रकारचे कोर्सेस देते, जसे डेटा सायन्‍स, फुल स्‍टॅक डेव्‍हलपमेंट, डेटा स्‍ट्रक्‍चर अँड अल्‍गोरिदम, जे त्‍यांना अपस्किल होण्‍यास तसेच उत्तम रोजगार संधी प्राप्‍त करण्‍यासाठी सक्षम होण्‍यास मदत करतात.

यामधून तरूणांमधील रोजगारासाठी आधुनिक काळातील कौशल्‍यांसह सुसज्‍ज असण्‍याप्रती वाढती मागणी दिसून येते. यापैकी बहुतांश विद्यार्थी उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्‍य प्रदेश, राजस्‍थान आणि दिल्‍ली एनसीआर येथील आहेत. याव्‍यतिरिक्‍त, सर्वसमावेशकता पीडब्‍ल्‍यू स्किल्‍सच्‍या मिशनचा आधारस्‍तंभ आहे, जेथे या कोर्सेसमध्‍ये २० ते २२ टक्‍के विद्यार्थि‍नी आहेत. या उपक्रमाची कार्यक्षमता २५,००० विद्यार्थ्‍यांमधून दिसून येते, ज्‍यांनी प्रमाणन प्राप्‍त केले आहे.

पीडब्‍ल्‍यू स्किल्‍सचे चीफ बिझनेस ऑफिसर आशिष शर्मा म्‍हणाले की, आम्‍ही यंदा आमच्‍या अपस्किलिंग कोर्सेसमध्‍ये दुप्‍पट वाढ करण्‍याचे नियोजन करत असताना आम्‍ही द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील तरूणांना विद्यमान रोजगार बाजारपेठेसाठी फ्यूचर-रेडी असण्‍यास सुसज्‍ज करण्‍यावर अधिक लक्ष केंद्रित करू. आम्‍ही भारतातील अनेक महिलांना अपस्किल व सक्षम करण्‍यासाठी आमच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये वाढ करण्‍याप्रती समर्पित आहोत, ज्‍यामुळे महिला कुशल कर्मचारीवर्गामध्‍ये अग्रस्‍थानी असण्‍याची खात्री मिळेल. आम्‍ही भावी नाविन्‍यता व यशाला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. तसेच आम्‍ही भारतातील तरूणांच्‍या व्‍यापक क्षमतांना समोर आणणे सुरुच ठेवू.

पीडब्‍ल्‍यू स्किल्‍स विद्यार्थ्‍यांसाठी आपल्‍या शैक्षणिक पोर्टफोलिओमध्‍ये विविधता आणण्‍यासाठी धोरणात्‍मक विस्‍तारीकरणासह २०२४ मध्‍ये अनेक अत्‍याधुनिक कोर्सेस सादर करण्‍यास सज्‍ज आहे, जसे सायबर सिक्‍युरिटी, यूआय/यूएक्‍स डिझाइन, स्‍टॉक मार्केट अॅनालिसिस, बँकिंग, फायनान्शियल सर्विसेस व इन्‍शुरन्‍स (बीएफएसआय), डिजिटल मार्केटिंग आणि प्रॉडक्‍ट मॅनेजमेंट. भारतातील स्किलिंग इकोस्टिममध्‍ये आमूलाग्र बदल होताना दिसण्‍यात येत आहे, जेथे प्रगत तंत्रज्ञान आणि वाढत्‍या डिजिटल कनेक्‍टीव्‍हीटीने पारंपारिक अडथळयांना दूर केले आहे. पीडब्‍ल्‍यू स्किल्‍सचे यश त्‍यांच्या उद्योग-सुसज्‍ज कोर्सेसची उपलब्‍धता, तसेच रिअल-टाइम उद्योग अनुभवामधून दिसून येते.

फिजिक्‍सवाला

पीडब्‍ल्‍यू स्किल्‍सने १२,०००हून अधिक व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या करिअरमध्‍ये बदल घडवून आणण्‍यास मदत केली आहे आणि प्रमाणन मिळाल्‍यानंतर वेतनामध्‍ये सरासरी ५५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. पीडब्‍ल्‍यू स्किल्‍स ४०० हून अधिक प्रतिष्ठित कंपन्‍यांसोबत सहयोगाने विविध कोर्सेस प्रदान करते. या कंपन्‍यांमध्‍ये तंत्रज्ञान कंपन्‍या जसे मायकोसॉफ्ट व व्‍हीएमवेअर, सल्‍लागार संस्‍था जसे डिलॉईज व ईवाय आणि आयटी कंपन्‍या जसे टीसीएस व इन्‍फोसिस यांचादेखील समावेश आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content