Wednesday, October 30, 2024
Homeचिट चॅटमुंबई टपाल विभागाची...

मुंबई टपाल विभागाची पेंशन अदालत 19 मार्चला!

मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारेटपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 54वी पेंशन अदालत दिनांक 19-03-2024 रोजी दुपारी तीन वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई- 400 001 येथे आयोजित केली आहे.

पोस्ट

निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांची सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक, ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालतमध्ये विचार केला जाईल.

पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्जाचे तीन प्रती, लेखा अधिकारी, अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई – 400 001ला 19-02-2024 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक स्वरुपात (तक्रारी मोठया प्रमाणात / इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकता. 19-02-2024च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.

भारतीय डाक विभाग

डाक पेंशन अदालतसाठी पाठवायच्या अर्जाचा नमुना

क्र. विषयवैयक्तिक / निवृत्तिवेतनधारक अन्वये भरण्यात येणारे तपशील
1निवृत्ती / मृत्युच्यावेळी पदनामासह निवृत्तिधारकाचे / कुटुंब निवृत्तिधारकाचे नाव 
2कार्यालयाचे नाव जिथून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीची तारीख 
3पीपीओ क्रमांक 
4पोस्टऑफिस आणि डिवीजनचे नाव जिथून  पेंशन घेतली जात आहे. 
5निवृत्तिवेतनधारकाचा पत्ता 
दूरध्वनीसह .
6थोडक्यात तक्रार 
(जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा.)
7व्यक्ती / निवृत्तिवेतनधारकांची सही आणि दिनांक   व मो.न. 

Continue reading

आज वसुबारस!

आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया. वसुबारस (गोवत्स द्वादशी)- श्री विष्णूच्या...

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...
Skip to content