Homeचिट चॅटटपाल खात्याच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी...

टपाल खात्याच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी 16 मार्चला पेंशन अदालत

मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत येत्या 16 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता  मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई- 400 001 येथे आयोजित केली आहे.

निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालतमध्ये विचार केला जाईल.

पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांची प्रकरणे, ई – वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी.च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.

निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपल्या अर्जाच्या तीन प्रति, लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई – 400 001 येथे 15 फेब्रुवारी 2023 रोजी किंवा त्यापूर्वी वैयक्तिक स्वरूपात (एकगठ्ठा/इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकतात. 15-02-2023च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.  

भारतीय डाक विभाग

डाक पेंशन अदालतच्या अर्जाचा फॉर्म

क्र.  विषयवैयक्तिक / निवृत्तिवेतनधारक अन्वये भरण्यात येणारे तपशील
1.निवृत्ती / मृत्युच्यावेळी पदनामसह निवृत्तिधारकाचे / कुटुंब निवृत्तिधारकाचे नाव 
2.कार्यालयाचे नाव जिथून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीची तारीख 
3पीपीओ क्रमांक 
4पोस्टऑफिसचे नाव जिथे पेंशन घेतली जात आहे. 
5निवृत्तिवेतनधारकाचा पोस्टाचा पत्ता दूरध्वनीसोबत. 
6थोडक्यात तक्रार (जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा.) 
7व्यक्ती / निवृत्तिवेतनधारकांची सही आणि दिनांक 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content