Monday, December 23, 2024
Homeकल्चर +‘पवनाकाठचा धोंडी’ व...

‘पवनाकाठचा धोंडी’ व ‘ताई तेलीण’ संग्रहालयात!

एनएफएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने 16 एमएम आणि 35 एमएमच्या 89 चित्रपटांच्या प्रतींची आपल्या खजिन्यात भर घातली आहे. मराठी चित्रसृष्टीच्या 1950 ते 1970 या सुवर्ण काळातल्या अनेक चित्रपटांसह महत्त्वाच्या काही हिंदी चित्रपटांचाही यामध्ये समावेश आहे. संग्रहालयाला 23 कृष्णधवल चित्रपट प्राप्त झाल्याने भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण युगातला अनमोल ठेवा प्राप्त झाला आहे. यात 1953मधला ताई तेलीण आणि 1966मधला पवनाकाठचा धोंडी, या अतिशय दुर्मिळ चित्रपटांचा समावेश आहे.

मराठी चित्रपटांच्या सुवर्ण काळातले महत्त्वाचे चित्रपट आणि गाजलेले काही हिंदी चित्रपट प्राप्त झाल्याने आनंद झाल्याची भावना एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केली. 1953मधला ताई तेलीण आणि 1966मधला पवनाकाठचा धोंडी हे अतिशय दुर्मिळ चित्रपट लुप्त झाले आहेत असे वाटत असतानाच हे चित्रपट एनएफएआयच्या खजिन्यात आले आहेत, याचा अतिशय आनंद झाला आहे. चित्रपट संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचे जतन करण्यासाठी चित्रपट निर्माते, वितरक आणि वैयक्तिक संग्रह करणाऱ्या व्यक्तींनी, चित्रपट आणि चित्रपट प्रसिद्धीचे साहित्य घेऊन पुढे येण्याचे आवाहन मगदूम यांनी केले.

‘ताई तेलीण’मध्ये शांता आपटे

1953मधला ताई तेलीण आणि 1966मधला पवनाकाठचा धोंडी हे अतिशय दुर्मिळ चित्रपट लुप्त झाले आहेत असे समजले जात असतानाच हे चित्रपट प्राप्त झाले आहेत. ताई तेलीण, हा आर्यन फिल्म कंपनीचा ऐतिहासिक चित्रपट असून शांत आपटे, सुधा आपटे, नलिनी बोरकर आणि झुंजारराव पवार या प्रसिद्ध कलाकारांच्या यात भूमिका आहेत. केपी भावे आणि अंतो नरहरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला मास्टर कृष्णराव यांचे संगीत होते.

उषा मंगेशकरांचा ‘पवनाकाठचा धोंडी’

अनंत ठाकूर यांचा ‘पवनाकाठचा धोंडी’ हा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट असून 1966मध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला होता. दिग्दर्शक म्हणून मराठीमधला हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ठाकूर यांनी राज कपूर यांची भूमिका असलेला चोरी चोरी, या 1956 मधल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. पवनाकाठचा धोंडी, या चित्रपटाची निर्मिती उषा मंगेशकर यांनी श्री महालक्ष्मी बॅनर अंतर्गत केली. जयश्री गडकर, चंद्रकांत आणि सुर्यकांत या प्रख्यात कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. प्रत्यक्ष जीवनात भाऊ-भाऊ असणारे चंद्रकांत आणि सूर्यकांत यांनी पडद्यावरही भावांची भूमिका साकारली होती, असा प्रसंग तसा दुर्मिळच म्हणावा लागेल.

पडद्यावर भावंडं म्हणून भूमिका साकारणे हा आपणा दोघा भावंडांसाठी भावनिक क्षण असल्याचे स्मरण सूर्यकांत यांनी एनएफएआयच्या श्राव्य इतिहास प्रकल्पाचा भागात केले. प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत होते.

‘देव पावला’ही संग्रहालयात

या संग्रहातला आणखी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे राम गबाले यांचा 1950मधला ‘देव पावला’. दामुअण्णा मालवणकर आणि विष्णूपंत जोग यांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. पुण्यातल्या प्रभात स्टुडिओमध्ये याचे चित्रिकरण झाले होते.

1955मधला राजन कुमार यांचा भाऊबीज, माधव शिंदे यांचा अंतरीचा दिवा (1960), दत्ता धर्माधिकारी यांचा सुभद्राहरण (1963), वसंत पिंतर यांचा बारा वर्षे सहा महिने तीन दिवस(1967), राज दत्त यांचा धाकटी बहिण (1970), केशव तोरो यांचा पुढारी (1972), गोविंद कुलकर्णी यांचा बन्या बापू (1977), राजा बारगीर यांचा दीड शहाणे (1979), सुशील गजवानी यांचा राखणदार (1982), कांचन नायक यांचा कळत नकळत (1989), या चित्रपटांचा यात समावेश आहे.

भालजी पेंढारकर यांचा साधी माणसं (1965), राजा ठाकूर यांचा राजमान्य राजश्री (1959), एकटी (1968) आणि घरकुल (1970), आणि रमेश देव यांचा छंद प्रीतीचा (1968) आणि जीवा सखा (1991) या गाजलेल्या मराठी चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटांचाही यात समावेश आहे.

हिंदीतला ‘नॉटी बॉय’ही दाखल

यासमवेत काही महत्त्वाचे हिंदी चित्रपटही यामध्ये आहेत. शक्ती सामंत यांचा नॉटी बॉय (1962), नायकाच्या भूमिकेत किशोर कुमार असलेला मिहान कुमार यांचा अमन (1967), रवींद्र दवे यांचा गेस्ट हाउस (1959), एम सादिक यांचा ताजमहल (1963), महमद हुसेन यांचा शिकारी (1963), केवळ मिश्र यांचा दो यार (1972) आणि उत्तम कुमार अभिनित अलो सरकार दिग्दर्शित (1978)मधला बंदी चित्रपटांचाही यात समावेश आहे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content