Homeचिट चॅटभाग घ्या 'ढाई...

भाग घ्या ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेत!

टपाल विभागातर्फे 2023-24 या आर्थिक वर्षासाठी ‘नवीन भारतासाठी डिजिटल इंडिया’ (डिजिटल इंडिया फॉर न्यू इंडिया) या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धकांनी मुंबई जीपीओ, मुंबई 400001 संचालकांना उद्देशून या विषयावर आपले मत व्यक्त करणारे पत्र लिहावे. रोख पारितोषिकांसाठी पात्र स्पर्धकांची निवड प्रथम प्रादेशिक पातळीवर आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर केली जाईल. 01.08.2023 ते 31.10.2023 या कालावधीत स्पर्धकांसाठी ही स्पर्धा खुली असणार आहे.

यावर्षीच्या ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेसाठी ‘डिजिटल इंडिया फॉर न्यू इंडिया’ हा विषय आहे. स्पर्धकांनी इंग्रजी/हिंदी/कोणत्याही स्थानिक भाषेत निबंध लिहून, मुंबई जीपीओ, मुंबई 400001 यांच्याकडे पाठवावा. राष्ट्रीय स्तरावरील ढाई आखर पत्रलेखन अभियानाचे  दोन गट आहेत (1) 18 वर्षापर्यंत : (अ) अंतर्देशीय पत्र कार्ड श्रेणी आणि (ब) लिफाफा श्रेणी आणि 18 वर्षांवरील वयोगटासाठी, (अ) अंतर्देशीय पत्र कार्ड श्रेणी आणि (ब) लिफाफा श्रेणी. लिफाफा श्रेणीअंतर्गत 1000 शब्दांपेक्षा जास्त शब्दमर्यादेसह साध्या ए-4 आकाराच्या कागदावर किंवा अंतर्देशीय पत्र श्रेणीसाठी 500 शब्दांपेक्षा जास्त शब्द मर्यादा असलेल्या इनलँड लेटर कार्डवर (आयएलसी) निबंध लिहिता येईल. स्पर्धेसाठी केवळ हस्तलिखित पत्रे स्वीकारली जातील.

निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक मुद्रांक आणि इनलँड लेटर कार्ड (आयएलसी) असलेले लिफाफा/ लिफाफा वापरण्यास परवानगी आहे. विभागीय पातळीवरील अंतिम निकाल 15 डिसेंबर 2023 पर्यंत जाहीर केला जाईल. सर्कल लेव्हल (महाराष्ट्र व गोवा) आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना देण्यात येणारी प्रस्तावित पारितोषिक रक्कम:- प्रत्येक श्रेणीत प्रथम पारितोषिक रु.25,000/, प्रत्येक विभागात द्वितीय पारितोषिकासाठी रु.10,000/-, प्रत्येक श्रेणीत तृतीय पारितोषिकासाठी रु.5,000/ आहे.

राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके:- प्रत्येक गटात प्रथम पारितोषिकासाठी 50,000 रुपये, प्रत्येक गटात द्वितीय पारितोषिकासाठी 25,000/ रुपये आणि प्रत्येक श्रेणीत तृतीय पारितोषिकासाठी 10,000 रुपये असे आहे. स्पर्धकांनी आपल्या वयाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. लिफाफा / अंतर्देशीय पत्र “ढाई आखर पत्र” असे लिहून पाठवावे. अधिक माहितीसाठी  www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content