Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून...

मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून तीन दिवस अंशतः ब्लॉक

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडजवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी उद्या, ११ जुलैपासून १३ जुलैपर्यंत सकाळी ६ ते ८ या वेळेत आणि दुपारी २ ते ४ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. तरी या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे.

या काळात प्रवाशांनी पुढील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा-

१) वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा-कालाडमार्गे पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

२) वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

३) खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग-

१) कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणेवरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

२) कोलाड येथून रवाळजे-पालीवरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

३) कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटावरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

Continue reading

शेतकऱ्यांच्या युरोप अभ्यासदौऱ्यासाठी भाई चव्हाण यांची निवड

राज्य कृषी विभागामार्फत आयोजित यंदाच्या शेतकरी परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण यांची युरोप गट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. १५ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा हा एकूण १४ दिवसांचा अभ्यास दौरा आहे. या...

महाराष्ट्रातल्या 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके घोषित

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातल्या पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य तसेच सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातल्या एकूण 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 31 पोलीस कर्मचाऱ्यांना 'वीरता पदक', उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेकरीता दिली जाणारी राष्ट्रपती पदके, पोलीस दलातल्या 4 अधिकाऱ्यांना आणि सुधारात्मक सेवा विभागातल्या 2 कर्मचाऱ्यांचा...

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी होती अशी फुलांची सजावट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काल झालेल्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून दादरच्या शिवाजीपार्क येथील स्मृती स्थळावर विविध फुलझाडांनी तसेच शोभिवंत झाडांनी सजावट केली होती. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मांडणी करण्यात आली. यामध्ये सफेद आणि पिवळ्या रंगाच्या...
Skip to content