Homeचिट चॅटपरशोत्तम रुपाला यांनी...

परशोत्तम रुपाला यांनी “नंदी पोर्टल”चा केला प्रारंभ!

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन येथे नंदी- नवीन औषध आणि लसीकरण प्रणाली पोर्टलसाठी ना हरकत प्रमाणपत्र मान्यता पोर्टलचा प्रारंभ केला. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सुगम पोर्टलबरोबर नंदी पोर्टलचे एकत्रीकरण झाल्यामुळे  पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग पारदर्शकतेसह नियामक मंजूरी प्रक्रिया सुलभ करेल तसेच पशुवैद्यकीय उत्पादनांच्या प्रस्तावांचे मूल्यमापन आणि परीक्षण अधिक सुव्यवस्थित होईल. रुपाला यांनी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली आणि डिजिटल इंडियाला चालना देण्यात आणि पशुधन तसेच  पशुधन उद्योगाच्या कल्याणाच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे अधोरेखित केले. प्राण्यांचे लसीकरण आणि फिरते पशुवैद्यकीय दवाखाने उपक्रमांनंतर  नंदी पोर्टलचा प्रारंभ हा आणखी एक उल्लेखनीय उपक्रम आहे. हा उपक्रम व्यावसायिक दृष्टीकोनातून संशोधक आणि उद्योगांनाही महत्वपूर्ण सहाय्य पुरवेल.  पशुपालकांमध्ये जागरुकता वाढवून तसेच लॉजिस्टिक सुविधांमध्ये सुधारणा केल्यानंतर औषधांचा वापर वाढेल.

या प्रसंगी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान यांनी हा विभाग, डिजिटल इंडिया मिशनशी सुसंगत प्रयत्न करत असल्याबद्दल प्रशंसा केली.

पशुवैद्यकीय लसींचा केवळ प्राण्यांच्या आरोग्यावर आणि उत्पादनावरच नव्हे तर सुरक्षित अन्न पुरवठा वाढल्यामुळे तसेच प्राण्यांकडून मानवापर्यंत संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखल्यामुळे मानवी आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे आणि होत आहे. हा आपल्या संपूर्ण परिसंस्थेचा  एक भाग आहे. म्हणूनच आपले पशुधन निरोगी ठेवणे आणि लस व औषधांचा नियमित पुरवठा राखणे महत्वाचे आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content