Homeचिट चॅटज्युनियर आशियाई जिम्नॅस्टिक्समध्ये...

ज्युनियर आशियाई जिम्नॅस्टिक्समध्ये परिणाचा जलवा!

फिलिपिन्स येथील मनिलामध्ये झालेल्या १९व्या आशियाई ज्युनियर तालबद्ध (ऱ्हिदमिक) जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताच्या परिणा राहुल मदनपोत्रा हिने आपल्या कलेचा उत्तम नजराणा सादर करत भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. जपान, कोरिया यासारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्यांवर सरशी साधत परिणाने सातासमुद्रापार भारताचा डंका वाजवला.

३१ मे ते ३ जून या कालावधीत रंगलेल्या या स्पर्धेत परिणा हिने ज्युनियर गटात अप्रतिम कामगिरी करत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. मलेशिया, कोरिया, जपान यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान असतानाही परिणाने २४.१५ गुणांची कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली. विशेष म्हणजे, अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी परिणा ही भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली आहे. या स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी परिणाने नोंदवल्यामुळे मुख्य प्रशिक्षक वर्षा उपाध्ये, प्रशिक्षक क्षिप्रा जोशी आणि सदिच्छा कुलकर्णी यांनी तिचे कौतुक केले आहे.

लीलावती पोदार हायस्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या परिणाने २०१४पासून जिम्नॅस्टिक्स खेळाकडे आपला मोर्चा वळवला. शिक्षण आणि खेळ यांची योग्य सांगड घालत परिणाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही अफलातून कामगिरी करत अनेक पदके आपल्या नावावर केली आहेत. गेल्या वर्षी थायलंड येथे झालेल्या १८व्या आशियाई ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परिणाने चांगली कामगिरी साकारली होती, मात्र अंतिम फेरीत पोहोचण्याचे तिचे स्वप्न अधुरे राहिले होते. मात्र पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८मध्ये हाँगकाँग येथे झालेल्या हाँगकाँग इंटरनॅशनल ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परिणा मदनपोत्रा हिने दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले.

राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही परिणाने आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्या वर्षी ठाणे इथे झालेल्या सीआयसीएसई-राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत परिणाने पाच सुवर्णपदकांची लयलूट करत दोन रौप्यपदकांवर मोहोर उमटवली होती. त्याआधी २०१९मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन कांस्यपदके आपल्या नावावर केली होती. २०१९च्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत परिणाने पाच सुवर्णपदके प्राप्त केली होती. त्यासोबत विविध कार्यक्रमांमध्येही तिने तालबद्ध जिम्नॅस्टिक्स या खेळाचे सादरीकरण केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content