Homeकल्चर +'पाहुणे येत आहेत...

‘पाहुणे येत आहेत पोरी..’ सोशल मीडियावर हिट

लग्नासाठी स्थळ पाहायला जाण्याची लगबग, धावपळ, काळजी व्यक्त करणारं “पाहुणे येत आहेत पोरी..” हे स्थळ चित्रपटातलं गाणं लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या टीजरला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अत्यंत श्रवणीय गाणं दाद मिळवत आहे. “स्थळ” हा चित्रपट महिला दिनाचे औचित्य साधत येत्या ७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून जयंत सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जयंत सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. अरेंज्ड मॅरेज, या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट “स्थळ” या चित्रपटातून दाखवली जाणार आहे.

“पाहुणे येत आहेत पोरी..” हे गाणं मीराबाई येते आणि आशिष नारखेडकर यांनी गायलं आहे. जयंत सोमलकर यांच्या शब्दांना माधव अगरवाल यांनी स्वरसाज चढवला आहे. हार्मोनियमवरची सूरावट आणि नेमका ठेका यांनी गाण्यातल्या शब्दांना आणखी रंजक केलं आहे. चित्रपटात पारंपरिकपणे गायिकांकडून गाणी गाऊन घेतली जातात. मात्र “स्थळ” चित्रपटातलं हे गाणं गाण्याची आवड असलेल्या, पण व्यावसायिक नसलेल्या मीराबाई या चंद्रपूरनजीकच्या महिलेने गायलं आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content