Homeबॅक पेज88 टक्क्यांपेक्षा अधिक...

88 टक्क्यांपेक्षा अधिक आयटीआरची प्रक्रिया पूर्ण!

प्राप्तिकर विभाग, प्राप्तिकर विवरणपत्रांची निपटारा  प्रक्रिया जलद आणि प्रभावी पद्धतीने करण्यासाठी कटिबद्ध आहे. आज म्हणजेच पाच सप्टेंबर 2023 पर्यंत, आर्थिक वर्ष 2023-24 साठी भरण्यात आलेल्या एकूण 6.98 कोटी आयटीआर पैकी, 6.84 कोटी आयटीआरची पडताळणी पूर्ण झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील सहा कोटींपेक्षा अधिक आयटीआरची पडताळणीनंतरची प्रक्रियादेखील 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 88 टक्के आयटीआर ची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच, 2.45 कोटींपेक्षा जास्त परतावे जारी करण्यात आले आहेत.

करविषयक सेवा अधिकाधिक निर्वेध आणि जलद करण्याच्या विभागाच्या प्रयत्नांना दिवसेंदिवस अधिकाधिक बळकट केले जात आहे. याच अनुषंगाने, आर्थिक वर्ष 2023-24 साठी, आयटीआरच्या प्रक्रियेचा सरासरी वेळ, (पडताळणी नंतर) कमी होऊन आता 10 दिवसांपर्यंत आला आहे. याआधी, 2022-23 मध्ये तो 16 दिवस इतका होता.

इथे हेही सांगणे आवश्यक आहे की प्राप्तिकर विभाग आयटीआरच्या खालील श्रेण्यांवर प्रक्रिया करू शकत नाही कारण विभागाला करदात्यांकडून काही विशिष्ट माहिती/कृती हवी आहे:

  1. आर्थिक वर्ष 2023-24 साठी सुमारे 14 लाख आयटीआर आहेत जे दाखल केले गेले आहेत. मात्र 4 सप्टेंबर 2023 पर्यंत करदात्यांनी त्यांची पडताळणी करणे बाकी आहे. पडताळणी करण्यात अयशस्वी झाल्यामुळे प्रक्रियेत विलंब होतो कारण करदात्याने त्यांच्या बाजूने पडताळणी पूर्ण केल्यावरच विवरणपत्र प्रक्रियेसाठी घेतले जाऊ शकते. म्हणूनच, करदात्यांना त्वरित पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  2. जवळपास 12 लाख पडताळणी आयटीआर असे आहेत ज्यांच्याबद्दल विभागाकडून अधिक माहिती मागविण्यात आली आहे, ज्यासाठी करदात्यांशी त्यांच्या नोंदणीकृत ई-फायलिंग खात्यांद्वारे संपर्क केला गेला आहे. करदात्यांनी अशा संपर्काला त्वरित प्रतिसाद देण्याची विनंती केली जाते.

अशी अनेक प्रकरणे आहेत, जिथे, आयटीआर ची प्रक्रिया पूर्ण केली गेली आणि परतावे देखील निश्चित करण्यात आले आहेत, मात्र अद्याप करदात्यांनी, त्यांच्या ज्या खात्यात परतावे जमा करायचे आहेत, अशा बँक खात्यांची वैधता पुष्टी केलेली नाही. खातेदारांनी ई पोर्टलच्या माध्यमातून ही पुष्टी करावी, असे आवाहन केले जात आहे.   परताव्याची जलद प्रक्रिया आणि जलद परतावे जारी करण्यासाठी प्राप्तिकर विभाग कटिबद्ध असून करदात्यांनी सहकार्य करावे अशी विनंती केली जात आहे.  

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content