Homeचिट चॅटआमची एसएससी आता...

आमची एसएससी आता ज्येष्ठ नागरिकांच्या कळपात!

गोष्ट खरी आहे की आमची एसएससी आता साठ वर्षांची झाली. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांच्या कळपात आली. काय म्हणता? नीट कळलं नाही? जरा सविस्तर सांगा की राव! म्हणजे असं झालं की आम्ही SSC (एसएससी), माध्यमिक शालांत परीक्षेसाठी शाळेतून बाहेर पडलो त्या गोष्टीला आज साठ वर्षे पूर्ण होत आहेत.

कारण आमची एसएससीची बॅच ही १९६४ची. मात्र आता आम्ही “म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान”! थोडक्यात सांगायचं तर आम्ही मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत १९६४ साली ११-अ या वर्गात होतो. म्हणूनच २०१४ साली आम्ही सारे जण एकत्र येऊन आमच्या एसएससीची पन्नाशी अर्थात सुवर्ण महोत्सव खूप उत्साहाने साजरा केला. या घटनेस आजमितीस ६० वर्ष पूर्ण झाली आहेत.

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतरसुद्धा आम्ही (‘अ’ वर्गातील मुले-मुली) नित्यनेमाने अधूनमधून स्नेहसंमेलन घडवीत असतो. असेच एक स्नेहसंमेलन गतसाली ऑक्टोबर महिन्यात मिलिंद सामंततर्फे विलेपार्ले‌ येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी, १० फेब्रुवारीला मोहन पराडकरने आपल्या निवासस्थानी आयोजित केले. या आमच्या स्नेहसंमेलनास १८-१९ जण येणारे होते. परंतु सर्वांचीच आता पंच्याहत्तरी सरली असल्याने वैयक्तिक, अपरिहार्य कारणामुळे काही जण येऊ शकले नाहीत. पर्यायाने आम्ही ११ जणच उपस्थिती देऊ शकलो.

असं असले तरी सारा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि एकमेकांसह गप्पागोष्टीत छानपणे रंगला. तो आनंद नक्कीच स्वागतार्ह होता. दुपारच्या सत्रात खास ऑर्डर देऊन बनवून घेतलेल्या उत्तम जेवणाचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला. सायंकाळी चहापान झाल्याने छान तरतरी आली. याप्रसंगी रवी ठाकूरने आपले पुढले स्नेहसंमेलन एप्रिलमध्ये करण्याचे सूतोवाच करून सर्वांना सुखद धक्का दिला. त्याच्या अर्धांगिनीनेदेखील याला दुजोरा दिला. म्हणजे तीन महिन्यानंतर पुन्हा सर्वांची गाठभेट होऊन या संख्येत उत्तम भर पडेल अशी आशा आहे. मात्र, मोहनकडील कार्यक्रम अतिशय सुंदर, खास आठवणीत राहण्यासारखा घडला हे नमूद केलेच पाहिजे.

– अशोक मोहिले, माहीम

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content