Homeमुंबई स्पेशलआमची पुढची पिढी...

आमची पुढची पिढी आता मोठ्या जागेत जाणार!

गेल्या तीन पिढ्या आमच्या बी डी डी चाळीतील छोट्याशा जागेत गेल्या. आता आमची पुढची पिढी तरी मोठ्या जागेत जाईल, अशी आशा बी डी डी चाळीतील ७४ वर्षांच्या सविता पेवेकर यांनी व्यक्त केली.

गेली अनेक वर्ष संपूर्ण इमारत एका कुटुंबासारखी राहिली. एकमेकांच्या सुखदु:खात, अडचणीत एकमेकांना मदत केली. भविष्यातसुद्धा असेच मोठे कुटूंब मोठ्या जागेत राहील अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली.

पिढी

बी डी डी चाळ ही एक संस्कृती आहे. इथून आजपर्यंत अनेक कलाकार रंगभूमीवर गेले. देशाला अनेक खेळाडू दिले. चाळ जरी असली तरी अनेक प्रतिभावंत या संस्कृतीतून घडले आणि मोठे झाले. आजपर्यंत भाडेकरू म्हणून राहिलेल्या सर्व रहिवाशांच्या या जागेचा पुनर्विकास होऊन यापुढे ते आपल्या हक्काच्या घराचे मालक होणार आहेत, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. बी डी डी चाळ ही मुंबापुरीची ओळख आहे. ती टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

ना म जोशी मार्ग, बीडीडी चाळ रहिवासी संघाचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे म्हणाले की,  मंत्रीमहोदय जितेंद्र आव्हाड स्वतः चाळीत राहिलेले असल्यामुळे येथील रहिवाशांची समस्या त्यांना जवळून माहित आहे. त्यामुळे या प्रकल्पाला त्यांच्या कार्यकाळात लवकरच गती येईल अशी आम्हा सर्व रहिवाशांना आशा आहे.

ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी पुनर्विकासाला पाठींबा दिला आणि आज येथील पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील अर्ध्यापेक्षा जास्त रहिवाशांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन जवळच देऊ केलेल्या  संक्रमण शिबिरात स्थलांतर केले आहे. उर्वरित लोकांचे लवकरच शंकानिरसन करून त्यांचेही स्थलांतर  करण्यात येईल. तात्पुरते असले तरी उत्तम संक्रमण शिबीर राहण्यासाठी रहिवाशांना शासनाने दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.   

या बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासाला काही मंडळी विरोध करीत आहेत. मात्र त्यांच्या सर्व मागण्या त्यांनी ऐकून घेऊन त्यांच्याशी योग्य असा संवाद साधून पुनर्विकासाचा मार्ग सुकर कसा होईल यावर लक्ष दिले. त्याचप्रमाणे स्वतः वेळोवेळी पुनर्विकासाच्या बाजूने आणि विरोधात असणाऱ्या लोकांशी संवाद साधून हा पुनर्विकास मार्गी लावण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील हा महाविकास आघाडीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथील रहिवाशांसाठी नक्कीच चांगला ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content