Homeपब्लिक फिगरएकच लक्ष्य! १...

एकच लक्ष्य! १ लाख मराठा उद्योजक!!

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने १ लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

बुधवारी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. महामंडळाच्या ५५६ लाभार्थ्यांना कर्ज आधी मिळाले, मात्र प्रमाणपत्र नंतर मिळाले. या लाभार्थ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत असलेली १० लाखांची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवून कालावधी परतफेड ७ वर्षांपर्यंत करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

छोटेमोठे व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना बळ देण्यासाठी लघु कर्ज योजनेची सुरुवात करण्यात येणार असून त्या अंतर्गत २ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल. या कर्जावरील व्याज परतावा महामंडळ देईल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणार आहे, असेही ते म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाची आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. महामंडळ कर्ज योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत आपण बैठक घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content